शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरच्या कुलकर्णी बंधूंचा समतेचा,स्त्री दाक्षिण्याचा पाडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 22:25 IST

दिवाळी म्हटलं की, घरातील स्त्रियांनी राबराब राबायचं अन् पुरुषांनी आपली पुरुषसत्ताक हुकूमत गाजवायची. पाडवा तर खास नवरोबांसाठीच असतो.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : दिवाळी म्हटलं की, घरातील स्त्रियांनी राबराब राबायचं अन् पुरुषांनी आपली पुरुषसत्ताक हुकूमत गाजवायची. पाडवा तर खास नवरोबांसाठीच असतो. भाऊबीजेचा अपवाद. पण नगरच्या भूतकरवाडीतील कुलकर्णी बंधुनी मात्र रूढी, परंपरेला छेद देत दिवाळी पाडव्याला परिवर्तनाची गुढी उभारली आहे. यादिवशी कुलकरण्यांच्या घरातील महिलांना पूर्ण विश्रांंती देत घरातील सर्व कामे पुरुष करतात.मंगला रघुनाथ कुलकर्णी या पंचाहत्तरीतील आजीबाई या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. त्यांची चार मुले सूर्यकांत व सर्वात धाकटा उमेश हे दोघे पुण्यात, दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रशेखर पैठण (औरंगाबाद) येथे वकील. तिसरे नंदकिशोर नगरच्या इंडियन सिमलेस कंपनीतून निवृत्त झालेले. उमेश यांनी दिवाळी पाडव्याला घरातील महिलांना पूर्णपणे विश्रांती देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी होकार दिला, अन कुलकर्णी परिवारात अनोखा दिवाळी पाडवा सुरू झाला. २०१३ पासून समतेची गुढी उभारून परिवर्तनवादी समतेची दिवाळी सुरु झाली.पाडव्याच्या दिवशी या परिवारात स्त्रियांचा कामाचा भार पुरुषच वाहतात. शुक्रवारी चारही भावांनी सकाळी आईची सुगंधी तेलाने मालिश करून तिला ओवाळले. नंतर प्रत्येकाने आपल्या पत्नीची सुगंधी तेलाने मालिश करून त्यांना ओवाळले. ओवाळणी म्हणून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावर्षी या घरात स्वावलंबनाची संकल्पना राबविली जात आहे. त्यानुसार घरातील प्रत्येक पुरुषाने आंघोळीनंतर आपापले कपडे धुवून टाकले. महिलांच्या फर्माईशीनुसार संध्याकाळी पुरुषांनीच पावभाजी तयार करून घरातील महिलांना ती खाऊ घातली. दिवाळीचा फराळसुद्धा पुरुषच बनवतात.पुणेकर उमेशने यावर्षीचा फराळ बनविला. यंदा चिठ्ठी काढून सकाळचा चहा नष्ट कोणी बनवायचा हे ठरलं. त्यानुसार गुरुवारी वकील चंद्रशेखर यांनी तर शुक्रवारी उमेश यांनी चहा नष्टा बनविला. भांडीसुद्धा या भावांनीच घासली, धुतली. नेहमी घरात स्त्रियाच राबत असतात, त्यामुळे आम्ही घरातील स्त्रियांवरील अन्याय नाही म्हणता येणार, त्यांच्यावरील भार कमी व्हावा म्हणून हि आगळी दिवाळी सुरु केली. मी पैठणला राहतो. त्यामुळे नाथांच्या घरची उलटी खुण म्हणतो तसे पाडवा हा पुरुषांच्या गौरवाचा, नाही तर स्त्रियांच्या गौरवाचा पाडवा सुरु केला. दरवर्षी वेगवेगळी संकल्पना आम्ही राबवतो. गेल्यावर्षी आजची तरुणाई व त्यांच्या अपेक्षा या विषयावर घरातील पुतण्यांसाठी परिसंवाद ठेवला होता. त्याच्या आदल्या वर्षी कविता लेखन व कविता वाचन ठेवले होते.-चंद्रशेखर व उमेश कुलकर्णी, अहमदनगर.