शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संकटग्रस्त महिलांच्या मदतीला आता धावून येणार ‘सखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:12 IST

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ठाणे, रायगडसह ११ जिल्ह्यांत ‘वन स्टॉप क्रायसेस सेंटर’ अर्थात ‘सखी मदत कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या मदत कक्षात पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, समुपदेशन, पोलीस मदत आणि कायदेशीर सल्ला मोफत देण्यात येणार आहे.

- नारायण जाधवठाणे : संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ठाणे, रायगडसह ११ जिल्ह्यांत ‘वन स्टॉप क्रायसेस सेंटर’ अर्थात ‘सखी मदत कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या मदत कक्षात पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा, समुपदेशन, पोलीस मदत आणि कायदेशीर सल्ला मोफत देण्यात येणार आहे. मदत कक्षासाठी केंद्र शासनाने दोन कोटी २१ लाख ७५ हजारांची भरीव मदत दिली आहे.केंद्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार ‘वन स्टॉप क्रायसेस सेंटर’ची प्रायोगिक तत्त्वावर राज्यात २०१५ मध्ये पुण्याच्या मुंढवा येथील मुलींच्या शासकीय निरीक्षणगृहात सुरुवात केली होती. केंद्राच्याच मान्यतेने त्याचे नामकरण ‘सखी’ असे करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जिल्ह्यांत हा कक्ष सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये ठाणे, रायगडसह नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या केंद्रांसाठी जी दोन कोटी २१ लाख ७५ हजारांची मदत दिली आहे, त्यापैकी आठ लाख १९ हजार १२० रुपये पुणे येथे यापूर्वी सुरू केलेल्या सखी मदत कक्षास देण्यात येणार आहेत. उर्वरित निधी नव्याने मंजूर केलेल्या ११ जिल्ह्यांतील मदत कक्षांना देण्यात येणार आहे.राज्याचे महिला आणि बालकल्याण आयुक्त आणि त्यात्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली हा मदत कक्ष कार्यरतअसेल. या मदत कक्षास चालू आर्थिक वर्षाच्या शेवटीच मान्यता दिल्याने ठाणे जिल्ह्यात तो कोठे असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्याची जागा निश्चित झाल्यावर तो पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. राजधानी मुंबईखालोखाल ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या असून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही लक्षणीय आहे. जिल्ह्यात सहा महापालिकांच्या क्षेत्रात दोन पोलीस आयुक्तालयांसह ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यक्षेत्र मिळून ७७ पोलीस ठाणी आहेत. सर्व शहरांत कष्टकºयांसह नोकरदार महिलांचे प्रमाण मोठे असून त्यांच्या मदतीला संकटकाळात सखी मदत कक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.पुढील आठवड्यात प्रस्ताव देणारसंकटग्रस्त महिलांसाठी केंद्र सरकारची ही अतिशय चांगली योजना आहे. सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पीडित महिलांना उपयुक्त ठरेल, अशा ठिकाणी हा सखी मदत कक्ष सुरू करण्यात येईल. यासाठी ठाणे महापालिकेकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा भूखंडांपैकी एखादा ३०० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड ताब्यात घेऊन ‘सखी मदत कक्ष’ सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील आठवड्यातच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन जागेसाठीचा प्रस्ताव त्यांना देण्यात येईल, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र