शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

लावणीवर थिरकल्या ‘सखी’

By admin | Updated: February 2, 2015 00:49 IST

शिट्ट्या-टाळ्याचा जल्लोष : चैत्राली राजेंच्या अदाकारीने ‘सखीं’ची लावण्यमय संध्याकाळ; अलोट गर्दी

कोल्हापूर : ढोलकीची थाप... घुंगरांचा नाद, टिपेचे सूर आणि आपल्या नटखट अदाकारीने आणि नृत्याच्या बिजलीने घायाळ करणाऱ्या लावण्यवती अप्सरा... लावणीच्या प्रत्येक सादरीकरणाला शिट्ट्या, टाळ्या आणि संगतीने ‘कोल्हापुरी स्टाईल’ने नृत्य करून मनमुराद आनंद लुटणाऱ्या ‘सखीं’नी आज, रविवारी मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक कलामंदिर दणाणून सोडले. तोंडाने शिट्टी वाजवीत आणि फेटे उडवण्याची हौस रुमालाने भरून काढत सखींनी ‘लावणी शो’चा आनंद द्विगुणीत केला. या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती.लोकमत ‘सखी मंच’च्यावतीने लावणीसम्राज्ञी चैत्राली राजे यांच्या संचाचा ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय...’ (चैत्रालीचा लावणी महोत्सव) या खास लोकमत सखींसाठी आयोजित लावणी कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. ‘तूच सुखकर्ता’ नृत्याने ‘लावणी शो’ला सुरुवात झाली. या गीतानंतर चैत्राली राजे यांनी सादर केलेल्या ‘या रावजी, बसा भावजी...’ या बैठ्या लावणीने या कार्यक्रमाला चार चॉँद लावले. संचातील नृत्यांगनांनी सादर केलेल्या ‘गर्र भिंगरी ग भिंगरी...’, ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला...’, ‘नाकी डोळी छान,’ ‘कुणीतरी न्यावं मला फिरवायाला...’ या नृत्यांनंतर राजे यांनी ‘गर गर गर भिंगरी गं भिंगरी...’ अशा एकापेक्षा एक ठेका धरायला लावणींवर लावण्यवतींनी सादर केलेल्या दिलखेचक अदाकारीने सखींनाही काही काळ वेड लावले. त्यामुळे त्यांनी एकच जल्लोष केला. अवघ्या महाराष्ट्राला ‘कारभारी दमानं होऊ द्या दमानं,’ ‘नाद खुळा,’ ‘पाडाला पिकलाय आंबा ’ या गाजलेल्या गीतांवर दिलखेचक नृत्य करीत नृत्यांगनांनी सखींनाही त्यांच्या तालावर थिरकायला लावले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक नृत्याविष्कारावर सखीही अगदी रममाण होऊन गेल्या होत्या. दर्दी रसिक असला की कलाकाराची कलाही खुलत जाते. त्याचप्रमाणे तब्बल दोन तासांचे दोन प्रयोग आज, रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे आयोजित केले होते. अधिक काळ तळपणाऱ्या या नृत्यबिजलीवर थिरकण्याचा आनंद सखींनीही लुटला. टाळ्या, शिट्ट्या आणि ‘वन्स मोअर’ची दाद देत सखींनी या बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. उच्चांकी गर्दी अ‍ॅप, पॉपच्या जमान्यातही आजही लावणीची जादू अबाधित आहे, याची प्रचिती देत तीन हजारांहून अधिक सखींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. काही सखींनी स्टेजवर जाऊन तोंडात शिट्ट्या वाजवल्या, तर काही सखींनी खेळण्यातील शिट्ट्या वाजवत स्कार्फ हवेत उडवीत, हात उंचावून टाळ्या वाजविल्या. लावण्यवतींचा साद आणि सखींचा प्रतिसाद अशा अभूतपूर्व गर्दीने हा कार्यक्रम रंगला. लोकमत ‘सखी मंच’तर्फे रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘चैत्रालीचा नाद करायचा नाय...’ लावणी शोमध्ये मुख्य नृत्यांगना चैत्राली राजेंची अदाकारी. दुसऱ्या छायाचित्रात कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सखी सदस्या.