शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षेत ‘सेल’च नापास; पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड, अनेकांची परीक्षेची संधी हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 07:06 IST

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारपासून सीईटी परीक्षांना सुरुवात झाली. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळी आणि दुपारच्या सत्रात तांत्रिक व सर्व्हर नेटवर्किंग बिघाडामुळे काही विद्यार्थ्यांची परीक्षा खंडित झाली, तर काही ठिकाणी परीक्षा विलंबाने सुरू झाल्याची माहिती मिळाली. अनेक ठिकाणी तर विद्यार्थ्यांना लॉगिनही करता न आल्याने त्यांची परीक्षेची संधी हुकली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात बीएड- एमएड (३ वर्षीय), बीपीएड, विधी (५ वर्षीय), तर दुपारच्या सत्रात एम. आर्क., एम. एड., विधी (५ वर्षे) आणि पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट या परीक्षा पार पडल्या.  या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागला.  

उडाला गोंधळnठाण्यातील कासारवडवली परीक्षा केंद्रात ६० विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत.nराज्यातही काही ठिकाणी अशाच तक्रारी आल्या.nअनेकांना तर लॉगिनही करता आले नाही. 

तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा होऊ शकली नाही किंवा पूर्ण होऊ शकली नाही, अशा विद्यार्थ्यांची पडताळणी करून त्यांची फेरपरीक्षा योग्य वेळी पुनर्नियोजित करण्यात येईल. त्याची सूचना सीईटी सेलमार्फत देण्यात येणार आहे.  - रवींद्र जगताप, आयुक्त, सीईटी सेल

टॅग्स :examपरीक्षा