Saif Ali Khan Marathi News: अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्द्यावर जोर दिला जात आहे. विरोधकांकडून गृहमंत्री, महायुती सरकार कारभारावर टीका होत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट म्हणाले, "सैफ अली खान असो वा दुसरं कोणी. कोणावरही हल्ला होत असेल, तर तो दुर्दैवी आहे. कोणीही त्याचे समर्थन करणार नाही, उलट निंदाच करेल. आरोपींना अटक करणे, हे सरकारचे काम आहे. सरकार ते काम करत आहे."
विरोकांची अशीच भूमिका राहिलेली आहे
संजय शिरसाट पुढे म्हणाले, "फक्त जातीचा उल्लेख करून राजकारण करणे हे विरोधकांची भूमिका राहिलेली आहे. जाती-जातींमध्ये तणाव वाढवणे आणि आपले राजकारण करणे, हा त्यांचा अजेंडा आहे. त्यांच्या बोलण्याला आम्ही कधी महत्त्व देत नाही. आम्हाला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही."
"सरकार आपले काम पूर्ण करेल. फक्त गृहमंत्रीच नाही, तर मुंबईतील सर्व पोलीस विभाग त्याच्या (आरोपी) मागे लागलेले आहेत. एक आरोपी पकडला गेला आहे, असेही आताच मी ऐकले आहे", असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.