शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थान सरकारला देणार ५०० कोटींचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 06:41 IST

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शिर्डीतील साई संस्थानने राज्य सरकारला तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शिर्डीतील साई संस्थानने राज्य सरकारला तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. मात्र, या बिनव्याजी कर्जाची परतफेड सरकार कधी करणार, याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्प चाळीस वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पासाठी १,२०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, शिर्डी संस्थानकडून बिनव्याजी कर्जरूपात ५०० कोटी, तर अर्थसंकल्पातून ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या १ फेब्रुवारीला कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याबाबतचा प्रस्ताव शिर्डी संस्थानकडे पाठविण्यात आला होता.भाविकांच्या पैशावर सरकारचा डोळाराज्यातील भ्रष्टाचारी सरकारचा आता भाविकांनी देणगी म्हणून दिलेल्या देवस्थानांच्या पैशावर डोळा आहे. देवस्थानांवर स्वत:च्या पक्षाशी संबंधित लोकांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत मनमर्जीप्रमाणे निर्णय करून घ्यायचे. हे मोदी मॉडल राज्यात सुरू आहे. रिझर्व्ह बँकेच्या पैशावरती मोदी सरकार ज्या पद्धतीने डोळा ठेवून आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील विविध देवस्थानांकडील पैशावर सरकारचा डोळा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. खा. चव्हाण यांनी या निर्णयाला विरोध केला असला, तरी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मात्र आपल्या पाठपुराव्यामुळेच साई संस्थानने हा निधी सरकारला देऊ केले असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :saibabaसाईबाबा