सुब्रतो रॉयच्या जामिनासाठी खटाटोप : भरत शहाच्या कंपनीकडून भूखंडाची खरेदी
जमीर काझी ल्ल मुंबई
हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या 8 महिन्यांपासून कोठडीची हवा खात असलेल्या सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना जामीन मिळविण्याच्या दृष्टीने त्यांच्या ग्रुपने पुढचे पाऊल टाकले आहे. वसईतील गोखिवरे व राजिवली या ठिकाणची तब्बल 265 एकर शेतजमीन विकण्यात आली असून, हिरे व्यापारी व सिनेदिग्दर्शक भरत शहा यांची भागीदारी असलेल्या साई :िहदम रिलेटर्स प्रायव्हेट कंपनीने तो खरेदी केला आहे. त्यासाठी त्यांनी तब्बल 1111.5 कोटी रुपये मोजले असल्याचे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले.
रियल इस्टेटमध्ये सध्या मंदीचे वातावरण असताना गेल्या काही वर्षातील या क्षेत्रतील हा मोठा व्यवहार असल्याचे या क्षेत्रतील जाणकारांकडून सांगण्यात आले. 5 नोव्हेंबरला सहारा व कंपनीमध्ये विक्रीच्या व्यवहाराबाबत करार झाला असून, त्याची प्रत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
गुंतवणूकदारांची 2क् हजार कोटीची रक्कम बुडविल्याबाबत सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजाविला होता. त्यानुसार 6 मार्चपासून ते न्यायालयीन कोठडीत असून, जामिनासाठी 1क् हजार कोटी रुपये जमा करण्याची अट घातली आहे. त्यापैकी 5 हजार कोटी रोख तर 5 हजार कोटी रकमेची बॅँक गॅरंटी द्यावयाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सहारा’ने गेल्या काही महिन्यांमध्ये गुडगाव, पुणोसह विविध ठिकाणी असलेली स्थावर व जंगम मालमत्ता विकून 3 हजार 117 कोटी रुपये भरले आहेत.
च्साई :िहदमने त्यांच्या वसई तालुक्यातील गोखिवरे व राजिवली या भागातील 265 एकर जमीन 1111.5 कोटींना खरेदी केली आहे.
च्या परिसरामध्ये बांधकाम क्षेत्रतील अमेया ग्रुपशी संबंधित ही कंपनी आहे. साई :िहदमचे प्रवक्ते प्रशांत कारुळकर म्हणाले, ‘भूखंड विक्रीचा करार गेल्या 5 नोव्हेंबरला केला आहे. जमीन ताब्यात घेऊन विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.