शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मराठवाड्याचा केशर आंबा, मंगळवेढ्याची ज्वारी टपाल तिकिटावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 09:56 IST

द्राक्ष, डाळिंबेही येणार; टपाल खात्याकडून ‘जीआय’ उत्पादनांची प्रसिद्धी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठवाड्याचा केशर आंबा, मंगळवेढ्याची ज्वारी यांंना भारतीय टपाल खात्याने तिकिटांवर स्थान दिले आहे. यासोबतच उत्पादक ते ग्राहक यांच्यात या मालाच्या वाहतुकीची जबाबदारीही टपाल खात्याने घेतली आहे.केंद्र सरकार, टपाल खाते व राज्य कृषी विभाग यांच्यातील समन्वयातून हे साध्य झाले आहे. आंबा, ज्वारीपाठोपाठ नाशिकची द्राक्षे, पुरंदरचे अंजिर, नागपूरची संत्री यांनाही लवकरच टपाल खात्याच्या पाकिटावर स्थान मिळणार आहे. फक्त शेतमालच नव्हे तर सोलापूरची चादर आणि टॉवेल यांनीही टपाल खात्याला आकर्षित केले असून तेही पाकिटावर झळकले आहेत.

या सर्व उत्पादनांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे त्यांना भौगोलिक चिन्हांकन-जीआय मिळाले आहे. केंद्र सरकारच्या एका संस्थेकडून उत्पादनाचा दर्जा, उपयोगिता, एकसारखेपणा असे अनेक निकष लावून हे चिन्हांकन दिले जाते. राज्याच्या कृषी व निर्यात विभागाने गेली काही वर्षे सातत्याने केलेल्या प्रयत्नातून राज्यातील २८ उत्पादनांना असे चिन्हांकन मिळाले आहे.गुणवत्ता असूनही या उत्पादनांना अपेक्षित प्रसिद्धी मिळत नव्हती. खासगी कुरियर कंपन्यांच्या स्पर्धेत काहीसे मागे पडलेल्या टपाल खात्याचा यात उपयोग होईल ही कल्पना पुढे आली. अल्पावधीतच ती अमलातही आली. महत्त्वाच्या घटनांचे स्मरण राहण्यासाठी टपाल खात्यातर्फे विशेष तिकिटे, पाकिटे प्रसिद्ध करण्यात येतात. त्याचा वापर या उत्पादनांसाठी करून घेण्यात आला आहे.

भौगोलिक मानांकनn जीआय म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन. भौगोलिक चिन्हांकन. हे वैयक्तिक दिले जात नाही. n एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्तजण एकाच दर्जाचा माल उत्पादित करत असतील तर त्या समुहाच्या मालाचा इतिहास, दर्जा, ऊपयोगिता, एकसारखे गूण तपासून जीआय टँग देतात. n त्यामुळे त्या मालाला प्रतिष्ठा मिळते व त्याचा ऊत्पादकाला फायदा मिळतो. औरंगाबाद विभागात सुरूवात

n औरंगाबाद टपाल विभागाने नुकतीच मराठवाडा केशरची तिकिटे आणि पाकिटेही प्रसिद्ध केली. n सोलापूर टपाल विभागाने तर एकाच वेळी सोलापूरची चादर, टॉवेल, मंगळवेढ्याची ज्वारी अशा तीन उत्पादनांची तिकिटे व पाकिटे समारंभपूर्वक प्रकाशित केली. n केंद्रीय टपाल खात्याने आपल्या प्रत्येक विभागाला त्यांच्या कार्यक्षेत्रातील ‘जीआय’ उत्पादनाची अशी तिकिटे व पाकिटे प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे स्थानिक वैशिष्ट्ये टपाल तिकिटे व पाकिटांवर दिसतील.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसMangoआंबा