मुंबई : माजी कसोटीपटू आणि राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा गावाचा विकास करण्यास पुढे आला आहे. खासदार आदर्श ग्राम योजनेतून गावाचा विकास करण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे गाव दत्तक घेतले आहे. सचिनने डोंजा गावाची निवड केल्याबद्दल आनंद वाटतो. सचिनच्या या कृतीने या परिसरातील अन्य गावांतही विकासाचे हे मॉडेल राबवले जाईल, अशी भावना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
सचिन तेंडुलकर करणार डोंजा गावाचा विकास
By admin | Updated: August 19, 2016 03:50 IST