शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

सबनिसांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त करायला हवी होती

By admin | Updated: January 15, 2016 01:51 IST

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे प्रतिपादन

सिद्धार्थ आराख/बुलडाणा: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे फार काही चुकले नाही, मला गोध्राकांडचे मोदी आवडत नाहीत., असं ते बोलले होते. हे वक्तव्य यापूर्वी अनेकांनी केलेले आहे.; मात्र सबनिसांच्या या वक्तव्यावरून उठलेल्या वादंगावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी, त्याचवेळी दिलगिरी व्यक्त केली असती तर एवढा स्तोम माजला नसता, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले. डॉ. पानतावणे हे बुलडाणा येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता, ते लोकमतशी बोलत होते. अ.भा.मराठी साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडेल याबद्दल शंका नाही, असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.आंबेडकरी चळवळीचे भवितव्य काय ?आंबेडकरी चळवळीत व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे चळवळ पतनाकडे चालली आहे., याला कोणी एक व्यक्ती नव्हे तर, सर्वच जबाबदार आहेत. प्रचंड अज्ञान असतानाही बाबासाहेबांचे नाव घेतले की, लोक टाळ्या देतात व आपलं नेतृत्व मान्य करतात, हा गैरसमज निर्माण झाल्याने चळवळ दिशाहीन होत चालली आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. दुर्दैवाने तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे आंबेडकरी चळवळ दिशाहीन होत चालली आहे.रिपाइंच्या विविध गटांचे नेते एकत्र का येत नाहीत ?सर्वच नेत्यांमध्ये अहंकार भरलेला आहे.; पण आता ऐक्य झालं पाहिजे, ते अपरिहार्य आहे. ऐक्यासाठी वामनदादासहीत आम्ही सर्व साहित्यिकांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. बैठक बोलाविली, सर्वच नेते हजर होते. त्यावेळी मी असे म्हटले होते की, नेत्यांना राजकीय प्रशिक्षणाची गरज आहे. त्यांनी बाबासाहेबांनी तयार केलेला शेड्युल कास्ट फेडरेशनचा निवडणूक जाहीरनामा वाचावा. यावर रा.सु.गवई यांना प्रचंड राग आला होता. तुम्ही आम्हाला आता प्रशिक्षण देणार काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. ऐक्याच्या बाबतीत वेळोवेळी हेच झालं. मी काय चुकीचं बोललो होतो. माझा तर दावा आहे की, प्रकाश आंबेडकरांसहीत एकाही नेत्यांनी बाबासाहेब पूर्णपणे वाचलेच नाहीत.केवळ जुजबी माहितीवर हे भाषण ठोकतात., नेत्यांनी आता बाबासाहेबांची राजकीय नीती समजून घेतली पाहिजे.रामदास आठवले नेहमीच वादग्रस्त वक्तव्य का करतात ?रामदास आठवले एक सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता आहे.; पण भाजपमध्ये त्यांची फरफट सुरू आहे. मी आधीच त्यांना सांगितलं होतं की, हे भाजपवाले धोका देतील, मंत्रीपद वैगरे काही देणार नाही.; पण त्यांनी ऐकलं नाही. आता अस्तित्व टिकवण्यासाठी हे सारं बोलावं लागत आहे. बाबासाहेबांनीसुद्धा त्या-त्या परिस्थितीनुसार इतर पक्षांशी राजकीय तडजोड, नव्हे करार केले होते. त्यांनी आजच्या नेत्यांसारखी घटक पक्षांना बुद्धी सर्मपित केली नव्हती, एवढे भान नेत्यांनी ठेवलं पाहिजे,तरच राजकीय जीवनात नेते यशस्वी होतील.रिपब्लिकन नेत्यांसाठी आपली काय सूचना असेल ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील राजकीय पक्ष निर्माण करायचा असेल तर, बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचा तयार केलेला जाहीरनामा आजच्या नेत्यांनी वाचावा आणि या जाहीरनाम्यातील काही अंशाचा जरी आपल्या राजकीय जीवनात वापर केला, तरी आंबेडकरी समाजाचे भले होईल. अस्मितादर्श साहित्य संमेलनाबद्दल काय सांगाल?१९७४ साली पहिले अस्मितादर्श साहित्य संमेलन भरले. तेव्हापासून आजतागायत ४८ वर्षात अस्मितादर्श या नियतकालिकाने व साहित्य संमेलनाने कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंतांच्या तीन पिढय़ा घडविल्या. अनेकांना लिहितं केलं. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरचे लेखक, कवी लिहू लागले. त्यांच्या भाषेत साहित्य तयार झाले. यावर्षीचे २१ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन वाशिम येथे होणार असून, प्रा. रवींद्र हडसन हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.