कोल्हापूर : ‘टोल हटवा ’असा एसएमएस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करा, असे आवाहन आज, गुरुवारी मंगळवार पेठ येथील गोपाळ कृष्ण गोखले (जी. के.जी.) महाविद्यालयात केले. संयुक्त रविवार पेठ मित्रमंडळाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी टोलबद्दलची छोटी स्टिकर्स विद्यार्थ्यांना वाटली.शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातून तयार केलेल्या खराब रस्त्यांना शहरवासीयांचा विरोध आहे. विविध आंदोलनांद्वारे गेली पाच-सहा वर्षे यासंबंधी लढा सुरू आहे. दोन दिवसांपूर्र्वी कोल्हापुरातील बहुसंख्य जणांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एस एम एस व मोबाईल केले होते. आज, गुरुवारी दुपारी गोखले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी छोटी स्टिकर्स देऊन ‘टोल हटवा’ असा एसएमएस करा, असे आवाहन केले. विवीध महाविद्यालयांत रोज जागृती करणार असल्याचे सांगितले. उपक्रमात अप्पा लाड, गजानन तोडकर, अशोक भोसले, महेश ढवळे, प्रसाद जाधव, सुनील खोत, आदीं सहभाग होता. (प्रतिनिधी
‘टोल हटवा’ असा एस. एम. एस. मुख्यमंत्र्यांना करा
By admin | Updated: November 28, 2014 00:31 IST