शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध नाकारणे क्रूरता

By admin | Updated: January 13, 2017 20:54 IST

पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास आणि एकत्र राहण्यास नकार देणे ही बाब क्रूरतेमध्ये मोडते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 - पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास आणि एकत्र राहण्यास नकार देणे ही बाब क्रूरतेमध्ये मोडते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.प्रकरणातील पत्नी पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत होती. तसेच, ती पतीसोबत राहण्यास तयार नव्हती. वारंवार माहेरी जात होती. स्वत:हून सासरी परत येत नव्हती. तिला घ्यायला जावे लागत होते. ती घरकामे करण्यास टाळाटाळ करीत होती. संयुक्त कुटुंबात राहण्याची तिची तयारी नव्हती. तिला स्वतंत्र रहायचे होते. अनेकदा समजावूनही तिने आपल्या स्वभावात परिवर्तन केले नाही. त्यामुळे पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. १४ एप्रिल २०११ रोजी कुटुंब न्यायालयाने याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे मत नोंदवून पत्नीची एकूणच वागणूक पाहता अपील फेटाळून लावले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. पत्नी अकोला तर, पती यवतमाळ येथील रहिवासी आहे. १७ डिसेंबर २००१ रोजी अकोला येथे त्यांचे लग्न झाले होते. पत्नीने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. सासरची मंडळी तंबाखाचा व्यवसाय वाढविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत होते. पैसे न दिल्यामुळे वाईट वागणूक देत होते. त्यांनी घरातून बाहेर काढले अशी बाजू तिने मांडली होती. परंतु, उलट तपासणीमध्ये ती वारंवार माहेरी जाऊन रहात असल्याचे आणि नव-यासोबत राहण्यास व शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असल्याचे स्पष्ट झाले.