शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine Conflict: पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या हाती चक्क भारताचा तिरंगा ध्वज! रुमानिया विमानतळावर दूतावासाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 13:13 IST

Russia-Ukraine Conflict: आपल्या विद्यार्थ्यांसाठी पाकिस्तानने काहीही पुढाकार घेतला नसताना ते भारताचा तिरंगा ध्वज हाती घेऊन मदतीची अपेक्षा करत आहेत.

संदीप भालेराव, लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘मिशन गंगा’ मोहीम सुरू करण्यात आली असताना पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानने काहीही केलेले नसल्याने पाकिस्तानी विद्यार्थी भारतीय ध्वज हाती घेऊन भारताकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत असल्याचे चित्र रुमानियाच्या बुखारेस्ट विमानतळावर दिसल्याचे मायदेशी परतलेल्या नाशिकच्या रिद्धी शर्मा या विद्यार्थिनीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाचे अधिकारीही मदत करीत असल्याचा अनुभव रिद्धीने सांगितला. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेली रिद्धी शर्मा ही विद्यार्थिनी  युद्धभूमीतून सोमवारी नाशिकला परतली. 

भारतीयांप्रमाणेच असंख्य पाकिस्तानी विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाकडून विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाकडून मदत मिळत नसल्याने त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे मदतीचा हात मागितला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी बुकारेस्ट विमानतळावर भारतीय दूतावासाचे काही अधिकारी असून पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आहे. यासाठी त्यांनी भारतीय ध्वज फडकविला असल्याचेदेखील रिद्धीने सांगितले. युक्रेनच्या युद्धभूमीत वैरभाव विसरून भारतीय अधिकारीदेखील या विद्यार्थ्यांना दिलासा देत असून त्यांना होईल तितकी मदत करीत आहेत.  विद्यार्थी रुमानियाच्या बुकारेस्ट विमानतळावरून आपापल्या देशांमध्ये परतत आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाNashikनाशिक