शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

ग्रामीण आरटीओला आता स्वतंत्र इमारत

By admin | Updated: August 13, 2014 00:49 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ, ग्रामीण) स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा संपणार आहे. मागील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मंजूर करण्यात आलेल्या १४ कोटी रुपयांमधील

१४ कोटींमधून मिळाला पहिला हप्ता : स्वातंत्र्यदिनी भूमिपूजननागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ, ग्रामीण) स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा संपणार आहे. मागील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मंजूर करण्यात आलेल्या १४ कोटी रुपयांमधील ६४ लाखांचा पहिला हप्ता कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन स्वातंत्र्यदिनी होत आहे.कामठी रोडवरील अन्न पुरवठा विभागाच्या गोदामात सहा वर्षांपासून आरटीओ कार्यालय अडकले आहे. केवळ ८ हजार चौरस फुटाच्या जागेवर जिल्ह्यासह नागपूर विभागाचा डोलारा हे कार्यालय सांभाळत आहे, परंतु येथे सोयीच्या नावाने चार भिंती आणि डोक्यावर टिनाचे छप्पर एवढेच आहे. येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विविध कामानिमित्त येणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रसाधनगृहाचा अभाव आहे. येथील कर्मचारी परिसरातील ओळखीच्या घरांतील प्रसाधनगृहाचा वापर करतात. महिला कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते तर येथे येणारे वाहनधारक मैदानाचा आश्रय घेतात. कार्यालयात पार्किंगची सोय नाही. अवैध पार्किंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे. शहरातील वाढत्या तापमानात टिनाच्या शेडखाली कार्यालयीन कामकाज सुरू असते. अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या या कार्यालयाला स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा होती. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रयत्नही सुरू होते. यामुळेच ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातच कार्यालयाला पाच एकरची जागा मिळाली. तीन वर्षांनंतर निधी मंजूर२०१० मध्ये स्वत:च्या जागेवर इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव पाठविण्यात आला. सुरुवातीला या प्रस्तावाची दखलच घेण्यात आली नाही. २०११ मध्ये शासनाने नव्या दराप्रमाणे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. कार्यालयाने सुधारित प्रस्ताव पाठवला. वर्षभरानंतर शासनाच्या वास्तुशास्त्र तज्ज्ञांकडून नकाशा तयार करून पाठविण्याचे पत्र मिळाले. लाखो रुपये खर्च करून वास्तुशास्त्र तज्ज्ञाकडून नकाशा तयार करण्यात आला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तळमजल्यासह चार मजली इमारतीसाठी १६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही पाठविण्यात आले. २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात विभागाच्या सचिवांनी या कार्यालयाची पाहणी केली. परंतु परिवहन कार्यालयाने एवढा निधी शक्य नसल्याचे कारण पुढे करीत, कमी निधीचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. कार्यालयाने प्रस्तावित इमारतीतील एक मजला, एक लिफ्ट, अंतर्गत रस्ते कमी करीत ११ कोटी ९७ लाख किमतीचे अंदाजपत्रक व नकाशा परिवहन कार्यालयाला पाठविला. परंतु मंजुरी मिळण्यास उशीर होत होता. लोकमत’ने यासंदर्भातील वृत्त लावून धरले होते. मागील हिवाळी अधिवेशनात ‘ग्रामीण आरटीओची गोदामातून सुटका कधी?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. अखेर प्रशासनाला जाग येऊन उशिरा का होईना १४ कोटींच्या बांधकामाच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. मंगळवारी यातील पहिल्या टप्प्यातील ६४ लाखांचा निधी प्राप्त झाला. यामुळे बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील वर्षात या कार्यालयाला स्वत:ची इमारत मिळण्याची शक्यता आहे .(प्रतिनिधी)