शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

लातुरात मुगाची आवक स्थिर, ४५० रुपयांनी भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 11:44 IST

बाजारगप्पा : मुगाची आवक स्थिर असली तरी या आठवड्यात दरात ४५० रुपयांची वाढ झाली आहे़ 

- हरी मोकाशे (लातूर)

लातूर उच्चतम  कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरापासून घटलेली शेतमालाची आवक आता वाढत आहे़ पंधरा दिवसांपासून सुरू असलेली मुगाची आवक स्थिर असली तरी या आठवड्यात दरात ४५० रुपयांची वाढ झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचा काही प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे़राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर बाजार समिती आहे़ येथील बाजारपेठेत चांगला दर मिळतो, असा शेतकऱ्यांना अनुभव आहे़ त्यामुळे लातूरसह, परजिल्ह्यातील तसेच शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातील काही शेतमाल येथे विक्रीसाठी येतो़ पावसाने गुंगारा दिल्यामुळे मूग, उडदाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे़ सोयाबीची काढणीही सुरू झाली आहे़ दररोज ८ ते १० पोते नवीन सोयाबीनही विक्रीसाठी येऊ लागले आहेत़

मागील आठवड्यात मुगाला प्रति क्विंटल सर्वसाधारण दर ४ हजार ३९० रुपये मिळत होता़ या आठवड्यात तो ४ हजार ८५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ त्याचबरोबर उडदाची आवक जवळपास ६०० क्विंटलने वाढली. सर्वसाधारण दरात २०० रुपयांची वाढ होऊन तो ४ हजार २५० रुपयांवर स्थिरावला आहे़ गतवर्षीच्या सोयाबीनची बाजारपेठेत आवक वाढली आहे़; परंतु दीडशे रुपयांनी घट झाली आहे़ ३ हजार १५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ तुरीची आवक घटली असून, ती दररोज ५५० क्विं़पर्यंत होत आहे़ आवक घटली की दर वाढतो, या बाजारपेठेतील नियमाप्रमाणे दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे़ रबीतील हरभऱ्याची दैनंदिन आवक दोन हजार क्विं़पर्यंत असून, दरात ४८० रुपयांनी वाढ झाली आहे़ सध्या ४ हजार ८० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ गव्हास सर्वसाधारण दर १९००, हायब्रीड ज्वारी १२५०, रबी ज्वारी १८००, पिवळी ज्वारी २३५०, करडई ३६०० आणि तिळास प्रति क्विं़ ८ हजार रुपये दर मिळत आहे़ 

दरम्यान, बाजारपेठेत नवीन शेतमालाच्या दरात वाढ होत असली तरीही केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मूग उत्पादकांना प्रति क्विंटल २ हजार १२५, उडदातून १ हजार ३५० रुपये कमी मिळत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासनाने आधारभूत किमतीनुसार हा शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात नाफेडचे पोर्टलच सुरू झाले नसल्याने आठवडा उलटला तरीही आॅनलाईन खरेदी सुरू झाली नाही.

नाफेडअंतर्गत खरेदीदार संस्थांची माहिती मिळविण्यातच नाफेड हैराण आहे. नोंदणीसाठी सध्या शेतकऱ्यांच्या हातात केवळ ३ ते ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नियोजित वेळेत आपल्या नावाची नोंदणी होईल काय? नोंद झाली तर मालाची खरेदी कधी होणार? पैसे हाती कधी पडणार? असे नानाविध सवाल शेतकऱ्यांच्या मनात घोळत आहेत. कारण दसरा, दिवाळी सण तोंडावर आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर लेकीबाळी माहेरी येतात, त्यांना कपडेलत्ते करणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे हवे आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र