- अझहर शेख
नाशिक : देशासह महाराष्ट्र राज्यातील हज यात्रेकरूंचा कोटा यावर्षी सौदी अरेबिया सरकारने वाढविल्याची पोस्ट व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने नागरिकांना वाचून सुखद धक्का बसला; मात्र राज्याच्या हज समितीने ही पोस्ट निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.हज यात्रा-२०१६ साठी सौदी सरकारकडून संपूर्ण जगाचा हज यात्रेकरूंचा कोटा वाढविण्यात आला असून भारतासाठीही वीस हजारांचा कोटा वाढविला गेल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवरून व्हायरल झाला. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून सलग अर्ज करूनही अद्याप प्रतीक्षा यादीत असलेल्या हज यात्रेसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या; मात्र राज्याच्या हज समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर याप्रकारची कुठलीही माहिती उपलब्ध नसून पदाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनीही अधिकृतरीत्या कें द्रीय हज समितीकडून अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. एकूणच हज यात्रेकरूंचा कोटा वाढविण्यात आल्याची व्हॉट्सअॅपवर फि रणारी पोस्ट निव्वळ अफवा आहे. या पोस्टवर कु ठल्याही प्रकारचा नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्ह्याचे हज यात्रा प्रशिक्षक जहीर शेख यांनी केले आहे.२०११च्या जनगणनेनुसार मुस्लीम लोकसंख्येनुसार हज यात्रेकरूंचा कोटा राज्यनिहाय जाहीर करण्यात आला आहे. सात हजार ८४ मूळ कोटा असून २७३ यात्रेकरूंचा अतिरिक्त कोटा आहे. राज्यासाठी एकूण सात हजार ३५७ इतका कोटा जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातून दोनशे यात्रेकरू हज समितीकडून जाणार असून चार वर्षांपासून जिल्ह्यातील ५८ इच्छुक सलग अर्ज भरूनही प्रतीक्षा यादींमध्ये आहे. संपूर्ण राज्यातून तीन हजार २८८ इच्छुक प्रतीक्षा यादीमध्ये आहे. आॅगस्टच्या ४ तारखेपासून यात्रेसाठी विमाने उड्डाण घेण्यास सुरुवात करणार आहेत. अखेरचे विमान ५ सप्टेंबर रोजी सौदीकडे उड्डाण घेणार आहे; मात्र सौदी सरकारने अद्याप हज यात्रेकरूंचा व्हिसा प्राप्त होऊ शकलेला नाही. राज्यभरातून ४७ हजार अर्जहज यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्या एकूण ४७ हजार ७५९ नागरिकांनी हज समितीकडे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी संगणकीय भाग्यवंत सोडतीद्वारे सात हजार ३५७ यात्रेक रूंची समितीने मंगळवारी (दि. १२) निवड केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या दोनशे नागरिकांचा समावेश आहे. सोडत राखीव श्रेणीमधून काढण्यास प्राधान्य देण्यात आले. राखीव श्रेणीमध्ये सलग चार वर्षांपासून अर्ज करणाऱ्या व्यक्तींचा तसेच वर्षाच्या सत्तरी गाठलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.