शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

राष्ट्रवादीत प्रवेश ही अफवा; भाजपामध्येच राहणार

By admin | Updated: March 28, 2017 03:26 IST

आपण भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे माझ्यावर

भुसावळ (जि. जळगाव) : आपण भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे माझ्यावर प्रेम करणारे भाजपाप्रेमी किंवा अन्य दुसरेही असू शकतात, अशी माहिती माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिली़ डुबती नैय्यात बसणार कोण?, अशी कोपरखळीही त्यांनी मारली़ गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नवाब मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेचे फोटो व्हायरल झाल्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी हा खोडसाळपणा असल्याचे सांगितले. स्वपक्षातल्या काहींचे आपल्यावर अधिक प्रेम आहे. त्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले़ आपण भाजपा सोडणार हे कार्यकर्त्यांनादेखील पटणारे नाही़ ज्या पक्षाचा विस्तार आपण केला, तो पक्ष आपण सोडणार नाही़ जे आज पदावर बसलेले आहेत ते एका दिवसात बसलेले नाहीत, असे ते म्हणाले. जिल्ह्याची आधीची खडकाळ जमीन आपण सुपिक केली आहे, त्यामुळे तिच्यावर तण तर वाढणारच, असेही ते म्हणाले. पक्ष सोडण्याचा विचारही आपल्या मनात नाही़ काहींना मात्र अफवा पसरवण्यात आनंद मिळतो. जुने चार ते पाच वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत़ कुणाला तरी मी जास्त आवडायला लागलो आहे, हे यातून सिद्ध होते़ अफवा पसरवणारा पक्षातीलच आहे, असेही नाही. सहवासातून कदाचित हे प्रेम निर्माण झालेले असावे, असेही ते मिश्किलपणे म्हणाले. (प्रतिनिधी)राष्ट्रवादी विलीन होण्याची अफवाशरद पवार यांना राष्ट्रपती बनवत असल्यास भाजपात विलीन करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, ही सोशल मीडियावरील चर्चाही अफवा असल्याचे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.