शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सत्तारूढ-विरोधक एकमेकांना भिडणार! विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 05:48 IST

राज्यातील ‘राजकीय बदला’ घेण्याच्या राजकारणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात उमटतील.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील ‘राजकीय बदला’ घेण्याच्या राजकारणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत  विरोधकांचे हल्ले तितक्याच जोरकसपणे परतवून लावण्याचा निर्धार करण्यात आला. त्याचवेळी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासह विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकत संघर्षाची नांदी दिली. स्वत: मुख्यमंत्री या चहापानाला उपस्थित नव्हते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बहुतेक सर्व मंत्री हजर होते. 

एरवी सभागृहातील आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद राज्यात उमटतात. मात्र, यावेळी अधिवेशनापूर्वीच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष शिगेला पोहोचला असताना बाहेरचे राजकीय वादळ दोन्ही सभागृहांमध्ये घोंगावणार अशी चिन्हे आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. विधानसभा अध्यक्षांची निवड ९ मार्चला होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा