शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आडव्या बाटली’साठीचे नियम तेच राहणार; दारू दुकान बंदसाठी मनपाचा ठराव ग्राह्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 07:25 IST

उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी एकूण दुकानांच्या तीन टक्के दुकाने वाढविली जातात. एक लाख नागरिकांच्या मागे दारू दुकानांचे प्रमाण इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कमी आहे.

मुंबई : एखाद्या वॉर्डातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर महिलांचे किती टक्के मतदान व्हावे, या संबंधीच्या नियमात कोणताही बदल केला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री व उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केले. 

खारघर येथील दारू दुकान बंद करण्याची मागणी करत भाजपचे प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. भाजपचे अभिमन्यू पवार चर्चेत सहभागी झाले. वॉर्डातील २५% महिलांनी दुकान बंद करण्याची मागणी केली पाहिजे, त्यानंतर जे मतदान होईल त्यात एकूण मतदारांच्या कमीतकमी ५०% महिलांनी दुकान बंद करण्याच्या बाजूने मतदान केले पाहिजे तरच ते बंद केले जाईल. 

हा २००९ पासूनचा सरकारचा नियम, त्यात बदल नाहीहा २००९ पासूनचा सरकारचा नियम आहे. त्यात बदल केला जाणार नाही असे अजित पवार म्हणाले. महापालिका वा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेने ठराव केला म्हणून दुकान बंद करता येणार नाही. संबंधित गृहनिर्माण संस्थेचा ठरावही गृहित धरला जाणार नाही. राज्यात दारूबंदी असलेले वर्धा आणि गडचिरोली हे दोन जिल्हे आहेत. चंद्रपूरमध्ये दारूबंदी केलेली होती, पण तेथे अवैध दारूचे प्रमाण वाढले, तरुण मुले अवैध दारूविक्रीतून पैसे कमावत होते, असे अजित पवार म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये दरवर्षी एकूण दुकानांच्या तीन टक्के दुकाने वाढविली जातात. एक लाख नागरिकांच्या मागे दारू दुकानांचे प्रमाण इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कमी आहे. १९७२ पासून नवीन दारू दुकानांसाठीचा एकही परवाना देण्यात आलेला नाही.

दारू दुकान बंदसाठी मनपाचा ठराव ग्राह्य नाहीएखादे दारू दुकान बंद करण्यासाठी महापालिकेने ठराव केला आहे म्हणून ते दुकान बंद केले जाणार नाही. महापालिकेला असा ठराव करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. खारघर हे पूर्वी ग्रामपंचायतीचे गाव होते, ते नंतर पनवेल महापालिकेत समाविष्ट झाले. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव केलेला होता, पण आता महापालिकेत ते समाविष्ट झाल्याने तेव्हाच्या खारघर हद्दीतील दुकान आता बंद ठेवता येणार नाही असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.