शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

‘रुद्र’ने न्यायालयात हजर व्हावे - सनातन

By admin | Updated: September 25, 2015 03:02 IST

मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित रुद्र पाटील याने न्यायालयात हजर व्हावे. त्याच्या मागे वकिलांची फौज उभी करू

कोल्हापूर : मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित रुद्र पाटील याने न्यायालयात हजर व्हावे. त्याच्या मागे वकिलांची फौज उभी करू, असे मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सनातन संस्था आणि हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी अटकेतील संशयित समीर गायकवाड याच्या बाजूने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर, अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वकीलपत्र घेतले आहे. रुद्रगौडा पाटीलही सनातन संस्थेचा अर्धवेळ साधक होता; पण २०११पासून न्यायालयाने त्याला मडगाव बॉम्बस्फोटामध्ये ‘फरार’ घोषित केल्यापासून तो आमच्या संपर्कात नाही. पण या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे; तसेच दुसरा संशयित प्रवीण लिमकर हाही संपर्कात नाही. त्या दोघांचा संपर्क झाल्यास त्यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचा मी निश्चितच सल्ला देईन, असेही अ‍ॅड. पुनाळेकर यांनी सांगितले.माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ धार्मिक दहशतवाद पसरवीत असल्याने त्यांची जागा तुरुंगातच आहे. त्यामुळे ते सनातन संस्थेच्या मागे लागल्यास आम्हीही गप्प बसणार नाही. त्यांच्यावरही दहशतवादाचा गुन्हा नोंदवून त्यांना धडा शिकवणार आहोत, असेही ते म्हणाले.श्याम मानव यांच्या संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ कोटी रुपये दिले आहेत. त्या पैशांवर ते देशभर दौरे करीत आहेत; तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची सर्वांत जास्त बदनामी त्यांनीच केल्याने त्यांना दिलेले पैसे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून परत घ्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)...तर हेमंत करकरेंना जन्मठेप! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दिवंगत पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा दृश्य हात होता, असा आरोप करून ते म्हणाले, करकरे यांनी एका संशयिताला अटक न करताच त्याला खासगी विमानाने तपासासाठी फिरविले. त्याची ब्रेन मॅपिंग तपासणी केली. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. आज करकरे जिवंत असते तर ते जन्मठेपेच्या कारवाईस पात्र होते. आव्हाड यांनी ‘आदर्श’ इतिहास तपासावाराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ‘सनातन’वर बंदी आणण्याची मागणी वारंवार करत आहेत. ‘सनातन’ची त्यांना अनेक प्रकरणे आठवत असतील तर मुंबईत ‘आदर्श’ सोसायटीप्रकरणी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांना आपल्या ‘फ्लॅट’चा उल्लेख करण्याचा का विसर पडला? याबाबतचा त्यांचा ढोंगीपणा आपण बाहेर काढू, असे अ‍ॅड. पुनाळेकर म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाराष्ट्रात अनेक घोटाळे केले आहेत. त्यांनी शासनाचे २ कोटी रुपये बुडविले असून, त्यापासून बहुजनांचे लक्ष विचलित करण्यासाठी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी ते वारंवार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.