शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र्र शासन’ पाटी वाहनांवर लावून फिरणाऱ्या तोतयांवर कारवाई, आरटीओची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 06:47 IST

वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी प्लेट लावून स्वतःला शासकीय कर्मचारी भासवणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

नवी मुंबई :

वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी प्लेट लावून स्वतःला शासकीय कर्मचारी भासवणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये २६ वाहने हाती लागली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे वाहनांवर महाराष्ट्र शासन अशी प्लेट लावून मिरविणारे आरटीओच्या रडारवर आले आहेत. 

खासगी अथवा ट्युरिस्ट वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ अशा प्लेट लावल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर वाहने घेतली जातात. त्याचाच फायदा इतर वाहनधारकांकडून घेतला जात आहे. स्वतःचे वाहन शासकीय कामकाजाकरता वापरासाठी असल्याचे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

टुरिस्ट वाहनांचाही कारवाईत समावेश कोणत्याही प्रकारे शासकीय कामांसाठी या वाहनांचा वापर होत नसतानाही त्यावर महाराष्ट्र शासनाची पाटी लावली होती. त्यात खासगी तसेच ट्युरिस्ट वाहनांचा समावेश आहे. या सर्वांवर दंडाची कारवाई केली आहे. तर यापुढेदेखील अशा वाहनांचा शोध घेऊन कारवाई केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टोल टाळण्यासाठी केला प्रताप काहीजण टोलवर फुकटात सुटण्याच्या उद्देशाने, वाहतूक पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हा प्रताप करतात. मात्र, त्यामुळे सर्वसामान्यांचीदेखील फसवणूक होण्याचा अधिक धोका असतो. तर अशा वाहनांचा गुन्हेगारी कृत्यासाठीदेखील वापर होऊ शकतो. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी अशा प्लेटच्या वाहनांचा शोध घेऊन खातरजमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी नेमलेल्या पथकाने मागील तीन दिवसांत २६ वाहनांवर कारवाई केली आहे.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस