शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

RTE Start in Maharashtra: आरटीई प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया आजपासून; एकापेक्षा अधिक अर्ज भरता येणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 09:54 IST

राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये असलेल्या २५ टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी १ मार्चपासून सुरू केली होणार आहे. एका विद्यार्थ्यांचे एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, असे प्राथमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरटीईसाठी अर्ज भरताना पालकांनी खबरदारी घेऊन अर्ज भरणे आवश्यक राहणार आहे. 

राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवून त्यावर आरटीईचे प्रवेश केले जातात. त्यामध्ये मागास, आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्यांक समाजातील घटकांना प्रवेश दिले जातात. 

दरम्यान, वंचित गटातील बालकांना आर्थिक उत्पन्नाची मर्यादा लागू नाही आणि ज्यांचे उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे, अशांचा आर्थिक दुर्बल घटकांत समावेश होतो, हे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. पालकांनी अर्ज भरताना जास्तीत जास्त १० शाळांची निवड करायची असून, गुगल मॅपचा वापर करत घरापासून शाळेचे स्थान निश्चित करायचे आहे. यामध्ये पालकांना केवळ ५ वेळा स्थान निश्चित करता येणार आहे. 

ही कागदपत्रे आवश्यक  आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या विविध कागदपत्रांची ही माहिती प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आली आहे. निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यातील एक पुरावा ग्राह्य धरता येईल.  याशिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटित महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा