शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या मागास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:16 IST

मोबाइल अ‍ॅप्लिकेशनला शून्य प्रतिसाद; तांत्रिक अडचणींचा पाढा सुरूच, पालकांमध्ये नाराजीचा सूर

मुंबई : राज्यात शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेशासाठी अर्ज नोंदणी सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ लाख ८५ हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे. मात्र ही नोंदणी आॅनलाइन झाली असून आरटीई मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवरून मात्र शून्य अर्जाची नोंद आहे.आरटीईसाठीची नोंदणी प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ती सुरू राहील. मोबाइल अ‍ॅप सुरूच न होणे, रहिवासी पत्ता आणि त्याप्रमाणे नकाशामध्ये योग्य जागा न दाखविणे, निवासी परिसरातील शाळांची योग्य यादी न दाखविणे, वारंवार अ‍ॅप हँग होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे आरटीईच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनला पालकांचा शून्य प्रतिसाद मिळाला आहे.दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आरटीईअंतर्गत चांगले शिक्षण मिळावे, आरटीई प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, पालकांना सायबरमध्ये जावे लागू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मोबाइल अ‍ॅप्लिकेशन पालकांसाठी अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले. आरटीई संकेतस्थळावरही याची लिंक उपलब्ध आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या पालकांमध्ये नाराजी असून त्यांनी या अ‍ॅपकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड होतानाच अडचणींना सुरुवात होत असल्याची प्रतिक्रिया मुक्तार अन्सारी या पालकाने दिली. या सर्व प्रक्रियेत दोन दिवस वाया गेले आणि अर्ज करायला उशीर झाला. शेवटी तारीख चुकू नये म्हणून पाल्याचा अर्ज सायबर कॅफेमध्ये जाऊन भरावा लागल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.संकेतस्थळावर अर्ज भरूनही मोबाइलवर मेसेज येत नाही. विभागीय केंद्रांवरही या समस्येमुळे अधिकारी त्रासले आहेत. पालक अडचणी घेऊन आले तरी यंत्रणेत तांत्रिक अडचणी असल्याने काहीही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.मार्गदर्शनपर हिडीओजचा अभावपालकांना आरटीईसाठी अर्ज कसे करावे? अर्जात कोणती माहिती कशी द्यावी? यासंदर्भात माहिती देणारे व्हिडीओज मागील वर्षी मराठी तसेच हिंदी भाषांत संकेतस्थळावर देण्यात आले होते. मात्र यंदा संकेतस्थळावर हे मार्गदर्शनपर व्हिडीओही उपलब्ध नाहीत. त्यामुळेही अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा