शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पोलिसांच्या भत्त्यात हजार रुपयांची वाढ, गणवेशासाठी मिळणार अधिक रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:23 IST

गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी  केला आहे.

मुंबई :  महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी अधिकाऱ्यांना वार्षिक पाच हजार रुपये गणवेश भत्ता मिळत होता. आता  पोलिस उपनिरीक्षक ते अपर पोलिस अधीक्षक या अधिकाऱ्यांना सहा हजार रुपये भत्ता मिळणार आहे. 

गृह विभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी  केला आहे.  गणवेश भत्त्यामध्ये वाढ केली जावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर गृह विभागाने पोलिसांची ही मागणी मान्य करून एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.

नुकतेच पोलिस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर आता गणवेश भत्त्याबाबतचा आणखी एक दिलासा देणारा निर्णय शिंदे - फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी गणवेश भत्ता देण्याऐवजी गणवेशाचे साहित्य दिले जात होते.

अनेक दिवस हीच पद्धत सुरू होती. मात्र, २०२१ मध्ये साहित्य देणे बंद करून त्याऐवजी पोलिस अधिकाऱ्यांना गणवेश भत्ता देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला.

टॅग्स :Policeपोलिस