शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अनुदान, दोन हेक्टर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:17 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई : भारतीय सैन्य दलातील शहिदांच्या कुटुंबीयांचे अनुदान २५ लाखांवरून ५० लाख करतानाच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी केली.‘वन फार आॅल अ‍ॅण्ड आॅल फार वन’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘अ ट्रिब्युट टू इंडियन आर्मी अ‍ॅण्ड सॅल्यूट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार हेमामालिनी, आमदार आशिष शेलार, निवृत्त मेजर जनरल राज सिन्हा, महावीर चक्र विजेते विंग कमांडर जगमोहन नाथ यांच्यासह विविध निवृत्त लष्करी अधिकारी आणि शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, शौर्य गाजविणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाºया शहिदांच्या कुटुंबियांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपले कर्तव्यच आहे. त्यासाठी शहिदांच्या कुटुंबीयांच्या अनुदानात दुपटीने वाढ करतानाच त्याच जिल्ह्यात शेतीसाठी दोन हेक्टर जमीन देण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात आले आहे. याशिवाय शौर्यपदक आणि सेवा पदक विजेत्यांसाठी एकरकमी पुरस्कारांच्या रोख अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मरणोत्तर शौर्य आणि सेवापदक धारण करणाºयांच्या कुटुंबीयांच्या मासिक अनुदानातही दुपटीने वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.नितीन गडकरी म्हणाले, आपल्या तिन्ही सेना दलातील सैनिक अतिशय प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या रक्षणासाठी सज्ज राहतात. प्रसंग आल्यास हौतात्म्यही पत्करतात. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशीही खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. अंतर्गत नक्षलवाद असो की सीमेवरील लढाई असो, सैनिकांचे योगदान विसरता न येण्यासारखे आहे. त्यामुळेच भारताची अखंडता आणि एकात्मता अबाधित आहे. स्वराज्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केला आहे. त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. आता या स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे. त्याच अनुषंगाने या शुरांच्या त्यागाप्रती कृतज्ञ राहावे लागेल. त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागालाही अभिवादन करावे लागेल.मरणोत्तर शौर्यपदक धारकांच्या कुटुंबीयांचे सुधारित मासिक अनुदानपरमवीर चक्र (३३ हजार), अशोक चक्र (२६.५ हजार), सर्वोत्तम युद्धसेवा पदक (२५ हजार), महावीर चक्र (२५ हजार), किर्ती चक्र (२० हजार), उत्तम युद्धसेवा पदक (१७ हजार), वीर चक्र (१४.५ हजार), शौर्य चक्र (९ हजार), युद्ध सेवा पदक (८ हजार), सेना, नौसेना आणि वायुसेना पदक (५.५ हजार), मेन्शन इन डिस्पॅच (२.५ हजार), व्हिक्टोरिया क्रॉस (२६.५ हजार).महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत शौर्यपदक आणि सुधारित रक्कम लाखांतपरमवीर चक्र (६०लाख), अशोक चक्र (६०), सर्वोत्तम युद्धसेवा पदक (३६), महावीर चक्र (३६), किर्ती चक्र (३६), उत्तम युद्धसेवा पदक (२४), वीर चक्र (२४), शौर्य चक्र (२४), युद्ध सेवा पदक (२४), सेना, नौसेना आणि वायुसेना पदक (१२), मेन्शन इन डिस्पॅच (६), परम विशिष्ट सेवा पदक (४), अतिविशिष्ट सेवा पदक (२), सेना, नौसेना आणि वायुसेना पदक (१.५), विशिष्ट सेवा पदक (एक लाख), मेन्शन इन डिस्पॅच (५० हजार).

टॅग्स :MartyrशहीदDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस