शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये मदत; राज्यपालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:21 IST

निकषापेक्षा अधिक, पण तोकडेच साह्य

मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमाल १६ हजार रुपयांची मदत मिळेल. बागायती/बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जाईल. त्यांना जास्तीतजास्त ३६ हजार रुपयांची मदत मिळेल.राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषापेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी भूमिका ‘लोकमत’ने मांडली होती. निकषापेक्षा जास्तीची मदत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केली असूनही, ती तोकडीच असल्याची टीका शेतकरी नेते व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. त्यातील ९० टक्के पिके कोरडवाहू आहेत आणि त्यांना हेक्टरी ८ हजार रुपयेच मदत मिळणार आहे. अवकाळी पावसाने राज्यातील ९० लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. त्यामुळे निकषापेक्षा दुप्पट तरी मदत मिळेल, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. एनडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत दिली जाते. त्यात १,२०० रुपयांचीच वाढ करण्यात आली आहे. मदतीचे वितरण तातडीने करण्याच्या सूचना राज्यपालांनी दिल्या आहेत. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आधीच पूर्ण केले आहेत.मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू होणारराष्ट्रपती राजवट लागताच मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता कक्ष बंद करण्यात आला होता. मात्र, आता तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या कक्षासाठी तीन अधिकाºयांची नियुक्ती करण्यास राज्यपालांनी शनिवारी मंजुरी दिली.परीक्षा शुल्क अन् शेतसारादेखील माफनुकसानग्रस्त शेतकºयांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्यात आला आहे.मदतीत वाढ हवी : भाजपहेक्टरी ८ हजार रुपये ही मदत अपूर्ण आहे. त्यात वाढ व्हायलाच हवी. त्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ मदत द्यावी, याचा पाठपुरावा राज्यपाल करतील, अशी अपेक्षा आहे. पीकविम्याचे २३ हजार कोटी रुपयांचे कवच शेतकºयांना मिळू शकेल. त्यासाठी विमा कंपन्यांशी समन्वय साधून तत्काळ मदत मिळावी.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप.केंद्र सरकारने राज्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. या मदतीतून पिकांचा खर्चसुद्धा वसूल होणार नाही. प्रशासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करणे अपेक्षित होते. विजेची बिले माफ करून रब्बीच्या पेरणीसाठीही उचल स्वरूपात शून्य टक्के व्याजदराने आवश्यक रक्कम देण्याची तरतूद करावी. - धनंजय मुंडे, राष्टÑवादीचे नेते.राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. शेतकºयांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी. इतर कामांसाठी मनरेगा किंवा रोजगार हमीतून मदत करण्यात यावी.- एकनाथ शिंदे, शिवसेना विधिमंडळ गटनेते.ही मदत तुटपुंजी आहे. या मदतीतून मशागतीचा खर्चदेखील निघणार नाही, शिवाय मच्छीमारांसाठीही मदत जाहीर करण्याची गरज आहे.- बाळासाहेब थोरात,प्रदेशाध्यक्ष काँग्रेस.शेतकºयांना गुंठ्याला केवळ ८0 रुपये मदत मिळणार आहेत. बागायती पिकांना गुंठ्याला १८0 रुपये मदत देण्याचे जाहीर झाले आहे. एकरला किमान २५ हजार रुपयांची सरसकट प्राथमिक मदत शेतकºयांना जाहीर करा.- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा.

टॅग्स :Farmerशेतकरी