शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

१३ बँकांना २००० कोटींचा गंडा

By admin | Updated: May 15, 2016 05:18 IST

बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर करा ही मागणी जोर धरत असतानाच एका कंपनीने १३ बँकांना २००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा महाघोटाळा समोर आला आहे.

सोपान पांढरीपांडे,  नागपूरबँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांची नावे जाहीर करा ही मागणी जोर धरत असतानाच एका कंपनीने १३ बँकांना २००० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा महाघोटाळा समोर आला आहे. या महाघोटाळ्याचा सर्वाधिक फटका बँक आॅफ महाराष्ट्रला (महाबँक) बसण्याची शक्यता आहे. बँकेचे जवळपास १ हजार कोटी अडकले आहेत.हा घोटाळा फेब्रुवारी २०१५मध्ये महाबँकेत उघडकीस आला आणि आता सीबीआय या घोटाळ्याची चौकशी करीत आहे. महाबँकेतील सूत्रांनुसार, सुरत येथील सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेड या मालवाहतूक कंपनीने १३ बँकांना अडचणीत आणले आहे. याच प्रकरणात ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात या बँकांनी कर्ज वसुलीसाठी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु कर्ज देताना सर्वच बँकांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्याने कर्ज वसूल होण्याची शक्यता धूसरच आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.सिद्धिविनायकने २०१२ साली ‘चालक से मालक’ योजनेचा प्रस्ताव बँकांना दिला. यानुसार बँकांनी चालकांना ट्रकसाठी कर्ज द्यायचे व सिद्धिविनायकने या चालकांना काम द्यायचे व ट्रकभाड्यापोटी दिल्या जाणाऱ्या रकमेतून कर्जाचे हप्ते बँकेत भरायचे, अशी ही योजना होती. त्यानुसार सिद्धिविनायकने २०१२ ते २०१५च्या दरम्यान अंदाजे ६ हजार चालकांच्या नावे १६०० ते १७०० कोटी कर्ज १३ बँकांकडून घेतले. परंतु कुणाच्याच कर्जाची परतफेड केली नाही. ३१ मार्च २०१५ रोजी व्याजासह कर्जाची रक्कम तब्बल २१७० कोटी रुपये झाली होती. देशातील सर्वांत मोठा ट्रक ताफाकंपनी मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेड ही कंपनी रूपचंद बैद यांनी २००२ साली अहमदाबाद येथे रजिस्टर केली आहे. कंपनीचे मुख्यालय सुरतला आहे. कंपनीच्या वेबसाईटवर सिद्धिविनायकजवळ देशातील सर्वांत मोठा ६ हजारहून अधिक ट्रकचा ताफा असल्याचा दावाही केला आहे.‘लोकमत’जवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, बहुतांश बँकांनी कर्ज प्रकरणात आवश्यक दस्तावेज प्राप्त न करता किंवा कर्जाची आरसी बुकमध्ये नोंद न करता अथवा बिले न घेताच कर्जाची रक्कम वाहन कंपन्यांना परस्पर दिली असल्याचे दिसत आहे.या प्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी वित्तमंत्री अरुण जेटलींना २३ एप्रिल २०१६ला लिहिलेले पत्रही ‘लोकमत’जवळ आहे. या पत्रात, चालकांना जुने ट्रक विकून सिद्धिविनायकने कर्जाची रक्कम बळकावली, तर नव्या ट्रकच्या बाबतीत सिद्धिविनायकने बँकांना वाहन कंपन्यांना परस्पर रक्कम द्यायला लावून त्यातून आपली देणी फेडली. प्रत्यक्षात चालकांना नवे ट्रक मिळालेच नाहीत, असा आरोप दिग्विजयसिंह यांनी केला आहे.> बँकांचे अडकलेले पैसेबँक३१ मार्च २०१५ कर्जबँक आॅफ महाराष्ट्र८५० कोटीओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स२८५ कोटीबँक आॅफ बडोदा२२३ कोटीस्टेट बँक आॅफ इंडिया१८९ कोटीअलाहाबाद बँक११३ कोटीबँक आॅफ इंडिया९१ कोटीआंध्रा बँक८९ कोटीकॉर्पाेरेशन बँक८५ कोटीयुनियन बँक आॅफ इंडिया ८२ कोटीपंजाब नॅशनल बँक७० कोटीइंडियन ओव्हरसीज बँक४८ कोटीसिडबी३० कोटीस्टेट बँक आॅफ त्रावणकोर१५ कोटी२१७० कोटी