शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राज्यातील ३९ कारखान्यांवर आरआरसी कारवाई : साखर आयुक्तालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:26 IST

उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम थकविल्या प्रकरणी राज्यातील ३९ साखर कारखान्यांना बुधवारी (दि. ३०) रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरजी) बजावण्यात आले.

ठळक मुद्दे१३५ कारखान्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु नोटीशीवर येत्या १ आणि २ फेब्रुवारीला साखर आयुक्तालयात सुनावणी होणार

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम थकविल्या प्रकरणी राज्यातील ३९ साखर कारखान्यांना बुधवारी (दि. ३०) रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) बजावण्यात आले. तर, १३५ कारखान्यांना तुमच्यावर आरआरसी कारवाई का करु नये अशी नोटीस देण्यात आली आहे. त्या नोटीशीवर येत्या १ आणि २ फेब्रुवारीला साखर आयुक्तालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील केवळ ११ साखर कारखान्यांनी १५ जानेवारी अखेरीस शेतकऱ्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. तर, १८० कारखान्यांनी ० ते ९९ टक्के रक्कम थकीत ठेवली आहे. या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपये थकीत आहेत. त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (दि. २८) साखर आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. त्यावेळी साखर आयुक्तांनी थकबाकी असलेल्या कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले होते. साखर आयुक्तालयाने शून्य ते १५ टक्के थकबाकी असलेल्या ३९ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे. यातील १२ कारखान्यांनी १५ जानेवारी अखेरीस एफआरपीचा एकही पैसा शेतकऱ्यांना दिलेला नाही. या कारवाईमुळे थकबाकीदार कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांची देणी वसुल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कायद्यानुसार कारखाना हद्दीतील जिल्हाधिकाऱ्यांना मालमत्ता विक्रीचे अधिकार आहेत. आरआरसी कारवाईनंतर जिल्हाधिकाऱ्यांना थकबाकी वसुलीसाठी संबंधित साखर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणता येते. याशिवाय राज्यातील १३५ साखर कारखान्यांना तुमच्यावर आआरसी कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे आणि सोलापूर या विभागातील कारखान्यांची सुनावणी येत्या १ फेब्रुवारीला तर, उर्वरीत महाराष्ट्रातील कारखान्यांची सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यानंतरही संबंधित कारखान्यांनी थकबाकी न दिल्यास त्यांच्यावर देखील आरआरसी कारवाई करण्यात येईल, असे साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले. --------------------------

१५ जानेवारी अखेरीस शून्य एफआरपी दिलेले कारखाने

कारखाना             रक्कम कोटींततात्यासाहेब कोरे-वारणा    ११६.०२देशभक्त आर.के - पंचगंगा    ७४.३९किसनवीर भुईंज        ६३.२७किसनवीर-प्रतापगड        ८.४१किसनवीर-खंडाळा        २२.३०विठ्ठल रिफाईंड शुगर-सोलापूर    ४२.१५समृद्धी शुगर-जालना        ४२.५६वैद्यनाथ-बीड        ३२.६४त्रीधारा शुगर-परभणी        १७.०६शैला अतुल शुगर-उस्मानाबाद    ५.३२शंभू महादेव-उस्मानाबाद    १०.३१पांगेश्वर-लातूर        १७.८०

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखाने