मान्यवरांना निमंत्रण : मित्रपक्षांना आश्वासन तर अपक्ष वेटिंगवर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघा अर्धा तास वेळ दिल्यामुळे भाजपा नेत्यांच्या कोअर कमिटीचे सदस्य आणि एक आदिवासी व एक दलित समाजातील मंत्री असा अवघ्या सात जणांचा शपथविधी शुक्रवारी होईल, असे संकेत मिळत आहेत. मात्र वानखेडे स्टेडियमवरील दिमाखदार सोहळ्य़ात आपल्याला शपथ दिली जावी, याकरिता अनेक ज्येष्ठ आमदारांनी दबाव आणल्याने ही संख्या काही अंशी वाढण्याची शक्यता आहे.
भाजपा विधिमंडळ पक्षाचे गटनेते
देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार व पंकजा मुंडे या कोअर कमिटीच्या सदस्यांना तसेच आदिवासी व दलित समाजातील प्रत्येकी एका आमदारास मंत्रिपदाची शपथ
देऊन वानखेडे स्टेडियमवरील शपथविधी समारंभ जास्तीतजास्त 1क् लोकांपुरता मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी सुरू ठेवला आहे.
मात्र गिरीश बापट, गिरीश महाजन, प्रकाश महेता, राज पुरोहित, हरिभाऊ बागडे अशा पाच ते सहा वेळा निवडून आलेल्या अनेक ज्येष्ठ आमदारांनी आपल्यालाही शुक्रवारी शपथ देण्याकरिता वेगवेगळ्य़ा मार्गाने दबाव आणण्यास सुरुवात
केल्याने मंत्रिपदाची शपथ घेणा:यांची संख्या दहार्पयत वाढण्याची शक्यता
व्यक्त होत आहे. फडणवीस हे तुलनेने
तरुण असून मंत्रिमंडळात समावेशास
उत्सुक असलेल्यांमध्ये वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असलेल्यांची संख्या जास्त
असल्याने त्यांच्यापैकी कुणी नाराज
होणार नाही, याकरिता कसरत करावी
लागत आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेला गाजर तर राष्ट्रवादीला लगाम
शुक्रवारी होणा:या शपथविधी सोहळ्य़ात कमीत कमी मंत्र्यांनी शपथ घेतली तर त्यामधून शिवसेनेकरिता
काही मंत्रिपदे रिक्त असल्याचा संदेश दिला जाऊ शकतो.
त्यामुळे सध्या वेगवेगळ्य़ा पदांची मागणी करीत अडून बसलेली शिवसेना सरकारमध्ये सामील होण्यास राजी होऊ शकते. याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसलाही लगाम बसू शकतो.
बहुतांश मंत्रिपदे विश्वासदर्शक ठरावापूर्वी भरली तर आता भाजपाचे सरकार आपल्या बिनशर्त पाठिंब्यावर अवलंबून आहे, असा राष्ट्रवादीचा समज बळावून ते सुरुवातीलाच भाजपावर दबावतंत्रचा वापर करू शकतात.
त्यामुळे एकाचवेळी शिवसेना व राष्ट्रवादी यांना खेळवण्याकरिता लहान मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे भाजपाने ठरवले आहे.
थांबा आणि वाट पाहा -शिवसेनेची भूमिका
भाजपा सरकारला पाठिंबा देण्यावरून शिवसेनेत अजूनही खल सुरू असून, आज दिवसभर मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही. भाजपासोबत बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी नेमकी कोणत्या पातळीवर आणि कोणात्या मुद्दय़ांवर ही बोलणी होत आहे, हे मात्र स्पष्ट केले जात नाही. ‘थांबा आणि उद्यार्पयत वाट पाहा’, एवढीच प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. एक-दोन मंत्रिपदासाठी सरकारमध्ये सहभागी व्हायचे की आत्मसन्मान राखत विरोधी पक्षात बसायचे, यावरून सेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे.
आश्वासनावर बोळवण अन् विश्वासदर्शक ठरावाची प्रतीक्षा
भाजपाचे मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं, रासपा व शिवसंग्रामच्या नेत्यांकडून शपथविधीत आपला समावेश करावा, याकरिता दबाव टाकणो सुरू आहे. मात्र पुढील टप्प्यात मंत्रिमंडळात समावेश करण्याचे आश्वासन देऊन त्यांची बोळवण केलेली आहे.
मंत्रिपदाची शपथ दिली गेली तर विधान परिषद नक्की पदरात पडेल, या खात्रीने आपला मंत्रिपदाच्या यादीत समावेश व्हावा, असा विनायक मेटे, महादेव जानकर यांचा आग्रह आहे. कदाचित कालांतराने ना मंत्रिपद ना आमदारकी, अशी अवस्था होण्याची भीती आहे.
फारच थोडय़ा मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेण्यामागे अपक्ष आमदारांना वेटिंगवर ठेवणो हाही हेतू आहे. अगोदर विश्वासदर्शक ठरावावर मतदानात सरकारला सहकार्य करा त्यानंतर मंत्रिपदाचे पाहू, असे स्पष्ट संकेत भाजपाने अपक्षांना दिले आहेत.
विधानसभेचे अधिवेशन 1क्ते12 नोव्हेंबरदरम्यान
नव्या सरकारला राज्यपालांनी विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करून घेण्याकरिता 15 दिवसांची मुदत दिली असल्याने येत्या 1क् ते 12 नोव्हेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. 1क् व 11 तारखेला आमदारांचा शपथविधी होईल. 12 तारखेला राज्यपालांचे अभिभाषण होईल व विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.
शपथविधीसाठी मान्यवरांना निमंत्रण
वानखेडे स्टेडियमवर होणा:या शपथविधी सोहळ्यासाठी रतन टाटा, मुकेश व अनिल अंबानी यांच्यासह भारतर} सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, आशा भोसले, चित्रपट अभिनेते शाहरूख खान, आमीर खान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राज्यातील सर्व खासदार व इतर राज्यांचे मुख्यमंत्री, विविध क्षेत्रंतील मान्यवर व्यक्तींना निमंत्रणो पाठविण्यात आली असून, आज नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन करून अनेकांना सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती केली.