शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी मार्गाचे काम थांबवू शकत नाही, उच्च न्यायालयात राज्य सरकारची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 06:31 IST

सरकारने एखाद्या जनहितार्थ प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असतील तर काही लोकांच्या हितासाठी तो प्रकल्प थांबवला जाऊ शकत नाही,अशी भूमिका मांडत सरकारने समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे समर्थन केले.

मुंबई : सरकारने एखाद्या जनहितार्थ प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असतील तर काही लोकांच्या हितासाठी तो प्रकल्प थांबवला जाऊ शकत नाही,अशी भूमिका मांडत सरकारने समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे समर्थन केले. या प्रकल्पामुळे राज्यातील बहुतांशी नागरिकांना लाभ होणार असून नव्या शहरांचा विकास होण्याची शक्यता आहे, असा दावा सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात केला.नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवदे ग्रामपंचायत व ९२ शेतकºयांनी समृद्धी महामार्गाविरुद्ध अ‍ॅड. रामेश्वर गीते यांच्याद्वारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महामार्गासाठीची सुमारे ८४ टक्के जमीन शेतजमीन असून त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. सरकारने या महामार्गासाठी पर्यायी जागा शोधावी किंंवा प्रस्तावित महामार्गाला समांतर असलेल्या घोटी-सिन्नर याच महामार्गावरून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विकास करावा, अशी विनंती याचिकेत केली आहे.मुंबई-नागपूर अशा ७०१ कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार ४६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. हा लोकोपयोगी प्रकल्प काही लोकांच्या हितासाठी थांबवला जाऊ शकत नाही. या प्रकल्पामुळे लोकांना मोठा लाभ होणार आहे. या मार्गाच्या आजूबाजूला नवीन शहरांचा विकास होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे सरकारने याचिकेला उत्तर देताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे....त्या जमिनी ताब्यात घेणारजे शेतकरी राज्य सरकारच्या धोरणानुसार किंवा योजनेनुसार स्वखुशीने जमिनी देण्यास तयार नसतील तर त्यांच्या जमिनी ‘राइट टू फेअर कॉम्पेनसेशन अ‍ॅण्ड ट्रान्स्परन्सी इन लँड अ‍ॅक्विीजिशन, रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन अ‍ॅक्ट २०१३’ अंतर्गत ताब्यात घेण्यात येतील, असेही सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग