शहरं
Join us  
Trending Stories
1
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
2
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
3
फोन आला अन् बाणेर हायवेवर अज्ञाताने वैष्णवीचे बाळ दिले; कुटुंबीयांची माहिती, आजोबा म्हणाले 'आयुष्यभर सांभाळू...'
4
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
5
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
6
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
7
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
8
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
9
"लडकियों को में भी देखता हूं, इतना क्या...", अभिनेत्रीकडे एकटक बघत होता, जाब विचारल्यावर म्हणाला...
10
हृदयद्रावक! भावाच्या जीवाची भीक मागत होती बहीण; पण कोणीच केली नाही मदत, झाली हत्या
11
विमानावर वीज पडली तर काय होते? इंडिगोच्या विमानाने भरवली धडकी, जाणून घ्या किती सुरक्षित...
12
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
13
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
14
Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!
15
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
16
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
17
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
18
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
19
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
20
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”

दादांनी हट्ट केल्यास मोर्चा विसर्जन नाही, मराठा मोर्चा कोअर कमिटीची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 20:53 IST

सकल मराठा मोर्चाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देणार आहे. या मोर्चाला कोणताही राजकीय रंग आम्हांला द्यायचा नाही. परंतू पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 10 -  सकल मराठा मोर्चाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देणार आहे. या मोर्चाला कोणताही राजकीय रंग आम्हांला द्यायचा नाही. परंतू पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन स्विकारण्याचा हट्ट केल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात येणार नाही व तोपर्यंत मोर्चाचेही विसर्जन होणार नाही अशी स्पष्ट भूमिका सोमवारी सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीवरून नवा वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रशासन आणि मोर्चाची कोअर कमिटी यांची सलोख्यासाठी एकत्रित बैठक सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी सकल मराठा समाजाच्या कोअर कमिटीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. मोर्चाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित राहणार असल्याची भूमिका यापूर्वी पालकमंत्री पाटील यांनी घेतली आहे. पण, या भूमिकेला मराठा मोर्चा कोअर कमिटीच्यावतीने पुन्हा विरोध केला आहे.बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी सैनी यांनी काही सूचना केल्या. त्यावेळी आम्ही फक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, ते निवेदन स्वीकारणार नसतील तर मोर्चा विसर्जित होणार नाही, अशी सूचना कोअर कमिटीच्या डॉ. जयश्री चव्हाण आणि चंद्रकांत साळोखे यांनी मांडली. पण, याचे खंडन करताना, पालकमंत्री पाटील हे मोर्चादिवशी कोल्हापुरात असल्याने निवेदन स्वीकारताना ते आमच्यासोबत दालनात उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. पण या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेला बैठकीतील सकल मराठा समाज कोअर कमिटीच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. आम्हाला मोर्चाला कोणताही राजकीय चेहरा नको आहे, त्यासाठी मोर्चातील नेत्यांनाही आम्ही मोर्चाच्या सर्वांत मागे ठेवले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करून पालकमंत्री पाटील यांना निवेदन स्वीकारतेवेळी उपस्थित राहण्यास विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)