शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

रोहिडेश्वर किल्ला हिरवाईच्या शालूने नटला

By admin | Updated: August 1, 2016 01:55 IST

भोर तालुक्याच्या दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर असणारा दुर्गम डोंगरी रोहिडेश्वर किल्ला परिसर पर्यटकांना भुरळ घालीत आहे़

संतोष म्हस्के,

नेरे- भोर तालुक्याच्या दक्षिणेस बारा किलोमीटर अंतरावर असणारा दुर्गम डोंगरी रोहिडेश्वर किल्ला परिसर पर्यटकांना भुरळ घालीत आहे़ रोहिडेश्वर किल्ल्यावरून पर्यटकांना भाटघर धरण, नीरा देवघर धरण, रायरेश्वर किल्ला यांच्याजवळून निसर्गरम्य व हिरवाईचा शालू पांघरलेल्याचे सौंदर्य पाहावयास मिळत आहे. यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे़भोरचा दक्षिण भाग हा सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा प्रदेश असल्याने पावसाळा चालू होताच या परिसरात लहान-मोठे धबधबे सुरू होतात़ या धबधब्यात ओलेचिंब होऊन पर्यटक आनंद लुटत आहेत़ बाजारवाडी गावाला ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी रोहिडेश्वर किल्ल्यास विचित्रगड नाव होते व ते तालुक्याचे ठिकाण होते़ या ठिकाणी बाजारपेठ होती व भव्य बाजार भरत असल्यामुळे या गावाला बाजारवाडी नाव पडले आहे़ गडावर शिवदुर्ग संवर्धन संस्था व बाजारवाडी ग्रामस्थांच्या माधमातून विकासकामे चालू आहेत़ गडावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायी मार्गाने जावे लागते़ विशेषत: या गडावर पर्यटक गिर्यारोहणासाठी-ट्रेकिंग आवर्जून येत आहेत़गडावर रोहिडमल्ल देवस्थान असून, अंधारतळे पातळनगरीतळे अशी २३ तळी आहेत. भोर-मांढरदेवी रस्तालगतच रोहिडेश्वर किल्ला असल्याने पर्यटक किल्ल्यावरून पर्यटन करून जवळीलच मांढरदेवी-काळूबाई गडाकडे रवाना होत असतात़ या वेळी वाटेवरच सात किलोमीटरचा आंबाडखिंड वळणा-वळणांचा घाट असून, या घाटात खळखळणारे धबधबे पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी मोहित करतात. >रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव असून, या ठिकाणी पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंग व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे़ हिरव्यागार वेलींनी फुललेल्या डोंगररांगांवरून गडावर मनमोहक दृश्य पाहण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी राज्यातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे़