शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

चक्क पोलीस ठाण्यातच डल्ला; 185 मोबाईलसह 7 लाखांची रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 14:53 IST

पोलिसांकडून तपास सुरू; पोलीस ठाण्यातल्या चोरीची शहरात चर्चा

कोल्हापूर: बँका, मंदिरं, घरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. असे प्रकार घडल्यावर लगेचच पोलिसांना माहिती दिली जाते. यानंतर पोलिसांकडून तपास केला जातो. मात्र कोल्हापूरमध्ये चक्क पोलीस ठाण्यावरच चोरट्यानं डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलीस ठाणंच सुरक्षित नसेल, तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोल्हापूरातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून तब्बल १८५ मोबाईल चोरीला गेले आहेत. पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हे मोबाईल हस्तगत केले होते. त्यांची किंमत जवळपास दोन लाख रुपयांच्या घरात आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा संपूर्ण प्रकार घडला. सध्या कोल्हापुरात सर्वत्र याच घटनेची चर्चा आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महमद पटेल यांनी तक्रार दाखल केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्याच्या कारकून स्टोअर रूममध्ये अज्ञातानं प्रवेश केला. लोखंडी कपाटातून विविध गुन्हे व कारवाईत जप्त करण्यात आलेले १८५ मोबाईल फोन त्यानं लंपास केले. याशिवाय ७ लाखांची रोकडदेखील लांबवली. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं. यासोबत ठसे तज्ज्ञांच्या मदतीनं काही पुरावेदेखील गोळा करण्यात आले.  सध्या पोलीस शहर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. इचलकरंजी आणि कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथक, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचं गुन्हे शोध पथक, उपविभागीय कार्यालयाचे पोलीस पथक यांच्याकडून सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी रेकॉर्डवरील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.   

टॅग्स :Mobileमोबाइल