शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

मेट्रो साकारणार विकासाचा ‘रोड मॅप’

By admin | Updated: August 21, 2014 01:19 IST

विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या, गुरुवारी भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे.

उपराजधानी होणार सुपरफास्ट : प्रकल्पाच्या भूमिपूजनासोबत कामांनाही येणार गती नागपूर : विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्या, गुरुवारी भूमिपूजन होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे. सोबतच २५ लाख नागरिकांची मेट्रो रेल्वे प्रवासाची स्वप्नपूर्ती होणार असल्याने शहरासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने उपराजधानीच्या विकासाचा ‘रोड मॅप’ साकारणार आहे. वाढती लोकसंख्या व वाहनांची होणारी गर्दी यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. मेट्रोमुळे ही समस्या मार्गी लागणार आहे. नागपूर शहरातील दोन मेट्रो मार्गांना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापती नगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रोमार्ग आहेत. या मार्गांची एकूण लांबी ३८.२ किलोमीटर आहे. सहा वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.महागाई निर्देशांकानुसार या प्रकल्पाची किंमत वाढून १०५२६ कोटींवर गेली आहे. या वाढीव किंमतीच्या प्रस्तावास नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पीआयबी(पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड)कडे पाठविण्यात आला. दिल्ली येथे पीआयबीच्या बैठकीत दुरुस्त्या व सुधारणानंतर ८ हजार ६८० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. दिल्ली मेट्रोरेल कार्पोरेशन कंपनी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या दोन्ही मार्गिकांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली होती. नागपूर मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कार्पोरेशन लिमिटेड नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल(एसीव्ही)कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि.या कंपनीस या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिकार देण्यात येणार आहे. तसेच ही कंपनी स्थापन होईपर्यत नागपूर सुधार प्रन्यास या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन संस्था म्हणून काम पाहात आहे. या प्रकल्पात केंद्र शासनाचा २० व राज्य शासनाचा २० टक्के तर महापालिका व नासुप्रचा प्रत्येकी ५ टक्के सहभाग राहणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी कर्ज आणि इतर स्रोताव्दारे उभारला जाणार आहे. (प्रतिनिधी)असे असतील स्टेशनकॉरिडोर -१ आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान आॅटोमोटिव्ह चौकनारी रोडइंदोराकडबी चौकगड्डीगोदाम चौककस्तूरचंद पार्कझिरो माइलसीताबर्डीकांग्रेसनगररहाटे कॉलनीअजनी चौकछत्रपति चौकजयप्रकाश नगरउज्ज्वलनगरजुने विमानतळनवे विमानतळखापरीअसे असतील स्टेशनकॉरिडोर -२ प्रजापतिनगर ते लोकमान्य नगर प्रजापतीनगरवैष्णो देवी चौकआंबेडकर चौकटेलीफोन एक्सचेंजचितारओळी चौकदोसर वैश्य चौकनागपूर रेलवे स्टेशनसीताबर्डी (इंटरचेंज)झांशी राणी चौकइंस्टीट्यूट आॅफ इंजिनिअर्सबँक आॅफ इंडिया, शंकरनगरलाड चौकधरमपेठ सायन्स कॉलेजसुभाषनगररचना रिंगरोड जंक्शनवासुदेवनगरबंसीनगरलोकमान्यनगर