विशाल शिर्के- पुणो
शिवाजीनगर गोदामात एका शिधापत्रिका एजंट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 19) लाच घेताना अटक केली. असे असताना बुधवारीदेखील येथे एजंटगिरी सुरूच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. एजंटांना कोणाचेही भय नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
शिवाजीनगर गोदामात रानू रमेश मिश्र (वय 45, रा. येरवडा) या महिला एजंटने नवीन शिधापत्रिकेसाठी 2 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिला लाच स्वीकारताना अटक केली होती. त्या पाश्र्वभूमीवर, लोकमत प्रतिनिधीने शिवाजीनगर गोदामाला भेट दिली असता, एजंटगिरी सुरूच असल्याचे दिसून आले.
शिवाजीनगर गोदामात अन्नधान्य पुरवठा विभागाची ड, ब, क, फ अशी चार परिमंडळ कार्यालये आहेत. या कार्यालयांतून कोथरूड, शिवाजीनगर, उत्तमनगर, सांगवी, पाषाण, औध, कसबा पेठ, मंगळवार पेठ, रस्ता पेठ अशा जवळपास निम्म्या शहरातील शिधापत्रिका व अन्नधान्य पुरवठय़ाचे काम चालते.
नवीन शिधापत्रिका काढणो, जुनी शिधापत्रिका बदलून घेणो, शिधापत्रिकेत नवीन नाव अंतभरूत करणो अथवा नाव कमी करण्याचे काम केले जाते. त्यासाठी नेहमीच परिमंडळ कार्यालयात नागरिकांची गर्दी असते. एजंटांचा सुळसुळाट थांबावा,
यासाठी सरकारने महा ई सेवा केंद्रालाही ही कामे करण्याची परवानगी दिली.
मात्र, त्यानंतरही या कार्यालयातील एजंटगिरी थांबलेली नाही. उलट,
महा-ई सेवा केंद्र-परिमंडळ कार्यालये यादरम्यान अर्जाचा प्रवास
होण्यास अधिक कालावधीच लागत आहे, याचा फायदा एजंटांनाच होतो.
परिमंडळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचा:यांच्या मदतीने एजंटगिरी सुरूच आहे. परिमंडळ कार्यालयात येणा:या नागरिकांना हेरून एजंट लोक कमी दिवसांत कामे करून देण्याची खुली ऑफर देतात. त्यासाठी 5क्क् रुपयांपासून काही हजारांमध्ये (व्यक्तीनुसार) रक्कम मागितली जाते. दोन वर्षापूर्वी पोलिसांनीदेखील शिधापत्रिका वितरण करताना काळजी घेण्याचे पत्र अन्न पुरवठा कार्यालयाला दिले होते. शहराला दहशतवादाचा धोका असल्याने खबरदारी घेण्याची सूचना केली होती. एजंटांच्या माध्यमातून सहज शिधापत्रिका मिळत असल्याने असे पत्र पाठविले होते.
तसेच, तत्कालीन अन्नधान्य वितरण अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी0देखील पोलिसांना पत्र पाठवून शिवाजीनगर गोदामातील एजंटांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, दोनही विभागांनी कागदी घोडे नाचविण्यापलीकडे त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अशी घातली जाते भुरळ
शिवाजीनगर गोदाम, गुरुवार, दुपारी साडेतीनची वेळ आवारात पोहोचताच एका महिला एजंटने विचारले, काय काम आहे ?
प्रतिनिधी : कोथरूड विभागासाठी रेशनिंग कार्यालयात काम आहे.
एजंट : काय काम ?
प्र. : शिधापत्रिकेत पत्नीचे नाव अंतभरूत (अॅड) करायचंय ?
ए : लग्नपत्रिका, पूर्वीचे नाव केल्याचा दाखला व सातशे रुपये लागतील. दोन दिवसांत तुम्हाला नाव अंतभरूत करून मिळेल.
प्र. : काही पैसे कमी होणार नाहीत का?
ए. : आधीच पैसे कमी सांगितलेयत. अर्जापासून इतर काम मीच करून देणार आहे.
पोलिसांची मदत
शिवाजीनगर गोदामात अजूनही एजंटगिरी सुरू असल्याचे अन्नधान्य पुरवठा अधिकारी धनाजी पाटील यांना लोकमत प्रतिनिधीने सांगितले. त्यावर एजंटगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.