शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त सैनिकाचा खोडसाळपणा; दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्याची अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 09:26 IST

कर्नाटकच्या पोलिसांना ट्रक ड्रायव्हर असलेल्या निवृत्त सैनिकाने फोन करून दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली आहे.

बेंगळूरु : महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा कर्नाटकच्यापोलिस महासंचालकांनी दिला होता. मात्र, चौकशीवेळी हा खोडसाळपणा ट्रक ड्रायव्हर असलेल्या एका निवृत्त सैनिकाने केल्याचे समोर आले आहे. या निवृत्त सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने हा इशारा देताना  यावेळी रेल्वेना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे मुंबईसह राज्यभरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. 

कर्नाटकच्या पोलिसांना एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली होती. यामध्ये त्याने कर्नाटक, महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. तामिळनाडूच्या रामनाथपूरममध्ये 19 दहशतवादी जमले असल्याचा दावाही त्याने केला होता. यामुळे लोकसभा निवडणुकीचा चौथा आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा असलेल्या मुंबईमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही माहिती देताना ट्रक चालकाने त्याचे नाव स्वामी नाथा पूरम असल्याचे सांगितले होते. 

 

तपासावेळी हा ट्रकचालक निवृत्त सैनिक असल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी अटक केल्याचे बेंगळुरू ग्रामीणचे  पोलिस अधिक्षकांनी सांगितले. त्याचे नाव सुरेंद्र मूर्ती असीन ते 65 वर्षांचे आहेत. 

लोकसभा निवडणूक आणि श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने समुद्रतटावरील शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये गोवा, मुंबई, गुजरात, कलकत्ता, चेन्नई या शहरांचा समावेश आहे.  

 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPoliceपोलिसKarnatakकर्नाटकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019