अलिबाग : अत्यंत चुरशीच्या अशा रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत अखेर शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांची संयुक्त राजकीय खेळी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. शेकाप-राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता रायगड जिल्हा परिषदेत येणार हे स्पष्ट झाले आहे.आ. सुनील तटकरे आणि आ.जयंत पाटील यांनी आपल्याच कुटुंबीयांना तिकिटे देऊन निष्ठावंतांवर अन्यय केला, असा आरोप करीत अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. अलिबाग तालुक्यांत तर राष्ट्रवादी संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी बाजी शेकाप-राष्ट्रवादीनेच मारली आहे.सेना-भाजपा फूटीनंतर सेना आणि काँग्रेस अशी युती झाली. काँग्रेसच्या वरिष्ठांचे आदेश झुगारून केवळ सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांना शह देण्याकरीता सेना-काँग्रेस अशी युती झाली, परंतु सेना व काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना ती रुचली नाही.शेकाप-राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केल्यावर शिवसेना हा मोठा विरोधी पक्ष राहाणार आहे. अल्पमतातल्या भाजपा आणि काँग्रेसला अपरिहार्यतेने विरोधीपक्षातच बसावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या आदिती सुनील तटकरे जि.प.अध्यक्षपदी विराजमान होण्याचे संकेत आहेत.रायगडपक्षजागाभाजपा०३शिवसेना१७काँग्रेस०३राष्ट्रवादी१२शेकाप२४
रायगडावर पुन्हा शेकाप
By admin | Updated: February 24, 2017 04:29 IST