शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भगवान गडावरील मेळाव्याबद्दल योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊ- पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 19:23 IST

भगवान गडावरील मेळाव्याबद्दल 'योग्य वेळी योग्य निर्णय' घेऊन भूमिका स्पष्ट करू, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे

ठळक मुद्देभगवान गडावरील मेळाव्याबद्दल 'योग्य वेळी योग्य निर्णय' घेऊन भूमिका स्पष्ट करू, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला विरोध कायम आहे.

परळी- भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला विरोध कायम आहे. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत. भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबतची आज माझी भूमिका स्पष्ट नाही, एकीकडे हजारो श्रद्धाळूंची भावना तर दुसरीकडे श्रद्धास्थान भगवान गड आहे, त्यामुळे याबद्दल 'योग्य वेळी योग्य निर्णय' घेऊन भूमिका स्पष्ट करू, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. पंकजा मुंडे परळीत बोलत होत्या.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 व्या गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे परळीत आल्या होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना आपण ' योग्य वेळी, योग्य निर्णय' घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी  कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मुंडे यांचे भाषण झाले, परंतु त्यांनी यावेळी मेळाव्यावर बोलायचं टाळलं.

भगवानगड दसरा मेळाव्यावरून समर्थकांमध्ये वादभगवानगडावर दसरा मेळावा घेण्यावरून मंत्री पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. याबाबत त्यांच्या समर्थकांनी परस्परविरोधी निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. श्रीक्षेत्र भगवानगडावर अनेक वर्षांपासून दसरा मेळावा होतो. वंजारी समाजाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यामुळे ३० सप्टेंबरला दसरा मेळावा गडावर घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बुलढाणा व वाशिम जिल्हा कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गड ताब्यात घेऊन दसरा मेळाव्यास विरोध केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजीही करण्यात आली.महंत नामदेवशास्त्री सानप यांच्या समर्थक असलेल्या शेवगाव तालुक्यातील राणेगाव व शिंगोरी येथील ग्रामस्थांनी शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांना बुधवारी निवेदन दिले. श्री क्षेत्र भगवानगड हे स्थान राजकारणविरहित आहे. त्याचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने दसऱ्याच्या दिवशी येथे कुठल्याही मेळाव्यास परवानगी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे