शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विवाहित मुस्लीम महिलेला पहिल्या पतीकडून देखभाल खर्च मागण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:39 IST

मुस्लीम स्त्रिया (घटस्फोटानंतर अधिकार संरक्षण) अधिनियम, १९८६ चा उद्देश घटस्फोटित मुस्लीम महिलांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे. त्यात पुनर्विवाहितेला बंधन घालण्यात आलेले नाही, असे निरीक्षण नोंदवित न्या. राजेश पाटील यांच्या एकलपीठाने पुनर्विवाहित मुस्लीम महिलेला दिलासा दिला. पतीची याचिका फेटाळली.

मुंबई : पत्नीचा पुनर्विवाह झाला म्हणून पहिला पती पत्नीला द्याव्या लागणाऱ्या देखभालीच्या खर्चातून सवलत घेऊ शकत नाही. ती दिल्यास पती कर्तव्यातून मुक्त होण्यासाठी पत्नीच्या दुसऱ्या विवाहाची प्रतीक्षा करेल. कायद्यानुसार, पुनर्विवाहित मुस्लीम महिलेला पहिल्या पतीकडून देखभालीचा खर्च मिळविण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. 

मुस्लीम स्त्रिया (घटस्फोटानंतर अधिकार संरक्षण) अधिनियम, १९८६ चा उद्देश घटस्फोटित मुस्लीम महिलांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे. त्यात पुनर्विवाहितेला बंधन घालण्यात आलेले नाही, असे निरीक्षण नोंदवित न्या. राजेश पाटील यांच्या एकलपीठाने पुनर्विवाहित मुस्लीम महिलेला दिलासा दिला. पतीची याचिका फेटाळली.

चिपळूणचा रहिवासी व कामानिमित्त सौदी अरेबियात असलेल्या मन्सूर खान (बदललेले नाव) याने खेड सत्र न्यायालयाच्या १८ मे २०१७ च्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. खेड सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करण्यास नकार दिला. मन्सूर खान याने पत्नीला पोस्टाद्वारे घटस्फोट दिला होता.

४.३२ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश - दंडाधिकारी न्यायालयाने महिलेला एकाचवेळी ४.३२ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश मन्सूरला दिले. सत्र न्यायालयाने मन्सूरचे अपील फेटाळत दंडाधिकारी न्यायालयाचा पोटगी देण्याचा अधिकार योग्य ठरविला. त्याउलट पोटगीची रक्कम वाढवून ९ लाख रुपये केली. - या निर्णयाला मन्सूरने उच्च न्यायालयात आव्हान दिले. यादरम्यान फरिदाने पुनर्विवाह केल्याने आपण तिला देखभालीचा खर्च देणे लागत नाही, असा युक्तिवाद मन्सूरकडून न्यायालयात करण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांतच फरिदाचा दुसऱ्या पतीबरोबरही घटस्फोट झाला. त्यामुळे मन्सूरने आता आपण देखभालीचा खर्च देऊ शकत नाही, असे न्यायालयाला सांगितले. - परंतु, न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळला. फरिदाने दुसऱ्या पतीकडून देखभालीचा खर्च मागितल्याचे कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMuslimमुस्लीमWomenमहिलाCourtन्यायालय