शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

तोंडी परीक्षा बंदचा निर्णय योग्यच

By admin | Updated: July 15, 2017 03:19 IST

तोंडी परीक्षा बंद करण्याच्या राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळातूनही स्वागत होत आहे.

स्नेहा पावसकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा बंद करण्याच्या राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळातूनही स्वागत होत आहे. हे गुण देण्याबाबत काही शाळांनी केलेला अतिरेक याला कारणीभूत असल्याचे मत काही आजीमाजी मुख्याध्यापकांनी व्यक्त केले असून विद्यार्थ्यांनी मात्र या निर्णयावर काहीशी नाराजी व्यक्त केली.नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची सध्या भाषा, द्वितीय भाषांच्या २० गुणांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. त्याची मुभा शाळांना होती. मात्र, बहुतांशी शाळांकडून विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जात असल्याने त्या बंद करण्याचा झालेला निर्णय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया ठाण्यात उमटू लागल्या. अनेक शाळांकडून याचा दुरुपयोग केला जायचा. खरे पाहता, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने पूर्वीच्या शासनाने तोंडी परीक्षेचा निर्णय घेऊन त्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी शाळांना दिली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत पूर्ण गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेच आहे आणि त्याला शाळांकडून सरसकटपणे दिले जाणाऱ्या तोंडी परीक्षेचे गुणच कारणीभूत असल्याचे मत मुख्याध्यापकांसह काही शिक्षकांनी व्यक्त केले.आम्ही ज्या काळी विद्यार्थी होतो, तेव्हा तोंडी परीक्षा नव्हत्या. मात्र, मध्यंतरी भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्याचे कारण भाषा ही केवळ लिहिण्याने नाही, तर बोलण्याने समृद्ध होते. लिहिण्याबरोबरच मुलांमध्ये भाषा गेय, ताल, लयबद्धतेत बोलण्याची कला आहे का, याचे मूल्यमापन तोंडी परीक्षेत केले जायचे. पण, काही शाळांनी याचा दुरुपयोग करून मुलांना पूर्णगुण दिले. त्यामुळे पूर्ण गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. सरकारचा निर्णय योग्यच आहे.- राजेंद्र राजपूत, मुख्याध्यापक, मो.ह.विद्यालयतोंडी परीक्षा बंद करण्याचा निर्णय योग्यच आहे. गेल्या काही वर्षांत काही शाळांनी या परीक्षांचे गुण देण्याबाबत अक्षरश: कहर केला होता. अशा शाळांना, शिक्षकांना चाप बसेल. १०० गुणांच्या लेखी परीक्षेतून आता खरे गुणी विद्यार्थी असतील, ते पुढे येतील, असे वाटते.- ज्योती परब, मुख्याध्यापिका, संकल्प इंग्लिश स्कूलराज्य शासनाचा निर्णय १०० टक्के योग्य आहे. अनेक शाळा ज्या मुलांना धड बोलताही येत नाही, त्यांना तोंडी परीक्षेचे पूर्ण गुण द्यायच्या. याला आता आळा बसेल. ५-१० टक्के शाळा वगळता उर्वरित शाळांमध्ये हाच प्रकार व्हायचा. त्या गुणांमुळे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना कोणालाच मानसिक समाधान मिळत नव्हते. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे.- संध्या धारडे, माजी मुख्याध्यापिकातोंडी परीक्षांचे गुण हक्काचे असायचे. त्यातही आमच्याकडून कविता पाठांतर किंवा वाचन करून घेतले जायचे किंवा आमच्या गृहपाठाच्या वह्या पूर्ण आहेत का, हे तपासले जायचे आणि त्यानुसारच शिक्षक गुण द्यायचे. त्यामुळे गृहपाठ, निबंध वह्या पूर्ण करणे, या अभ्यासाचीही दखल घेतली जायची. मात्र, आता १०० गुणांच्या पूर्ण लेखी परीक्षेच्या घेतलेल्या निर्णयामुळे या कवितावाचन, वर्ग-गृहपाठ या अभ्यासाचे महत्त्व फारसे राहणार नाही, असे वाटते. हा निर्णय काहीसा अयोग्य वाटतो.- महिमा जोशी, विद्यार्थिनीसगळ्याच शाळा काही विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे पूर्णच्या पूर्ण गुण देत नव्हत्या. तोंडी परीक्षेतील उत्तरानुसार गुण दिले जायचे. त्यातच काही विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचे दडपणही असते. मात्र, तेच विद्यार्थ्यांची प्रश्नांची उत्तरे तोंडी सहज देतात. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना या तोंडी परीक्षा सोप्या जायच्या. मात्र, त्याच बंद करण्याच्या जो निर्णय झाला आहे, तो चुकीचा वाटतो. विद्यार्थ्यांचा विचार करून त्यात काही बदल व्हावेत, असे वाटते.- पराग राजुले, विद्यार्थी