ठाणे : शनिवारी ठाण्यात एसटी बसचालकाला मारहाण करून फरार झलेल्या अफसर कुरेशी (३२) या रिक्षाचालकाला ठाणेनगर पोलिसांनी अखेर सोमवारी रात्री अटक केली. मात्र, त्याने आपण बसचालकाला कोणतीही मारहाण केली नसून केवळ बाचाबाची झाल्याचे सांगितले. शनिवारी दुपारी पनवेल-ठाणे एसटी घेऊन चाललेले एस. ए. खरात यांना कोर्टनाका येथे मारहाण झाली होती. वाहक प्रशांत जाधव यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीत रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागला होता. दुसरा शनिवार व रविवार आरटीओ कार्यालय बंद असल्याने त्या रिक्षा चालक व मालकाचे नाव व पत्ता पुढे येत नव्हते. (प्रतिनिधी)
‘तो’ रिक्षाचालक अखेर गजाआड
By admin | Updated: February 15, 2017 03:28 IST