शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वर्षेच; मॅटचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 08:31 IST

बढतीसाठी पात्र असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची घुसमट लक्षात घ्या; अन्यथा आरोग्य विभागाची प्रकृती ढासळेल, असेही मॅटने आदेशात नमूद केले आहे.

अमर मोहितेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे प्रथम श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे करणारा राज्य शासनाचा अध्यादेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केला. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेशही मॅटने राज्य शासनाला दिले आहेत.

आपल्याकडे पुरेसे वैद्यकीय अधिकारी नाहीत, याचे राज्य शासनाने आत्मपरीक्षण करायला हवे. पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी बढती द्यायची सोडून राज्य शासनाने चुकीच्या पद्धतीने अध्यादेश काढला आणि प्रथम श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय वाढविले आहे, असे निरीक्षणही मॅटने नोंदविले आहे.

बढतीसाठी पात्र असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची घुसमट लक्षात घ्या; अन्यथा आरोग्य विभागाची प्रकृती ढासळेल, असेही मॅटने आदेशात नमूद केले आहे. पुरेसे वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत, असा मुद्दा नाही. सरकारी नोकरीत वेळेत बढती मिळत नाही. त्यामुळेच आजकालचे तरुण वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होत नाहीत, हा अर्जदारांनी केलेला दावा नाकारला जाऊ शकत नाही, असेही मॅटने नमूद केले.

३१ मे २०२१ रोजी राज्य शासनाने हा अध्यादेश जारी केला. त्यावेळी प्रथम श्रेणीतील १९३ वैद्यकीय अधिकारी निवृत्त होत होते. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी निवृत्त झाले तर त्याचा सरकारी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रथम श्रेणीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६२ करण्यात येत आहे, असे या अध्यादेशात नमूद करण्यात आले होते.

बीड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम व इतरांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅट सदस्य पी. आर. बोरा व बिजाय कुमार यांच्यासमोर ही सुनावणी झाली. ॲड. अविनाश देशमुख व ॲड. संजय भोसले यांनी अर्जदारांकडून बाजू मांडली तर प्रशासनाच्या वतीने ॲड. एम. एस. महाजन यांनी युक्तिवाद केला. रिक्त पदे तातडीने भरण्याच्या निर्णयामुळे लवकरच याबाबत भरतीचा निर्णय घेण्यात यावा, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

वय वाढीचा आदेश रद्दn२० मार्च २०२० रोजी खंडपीठाने निकाल देत वाढविलेले वय नियमबाह्य असल्याचा निर्वाळा देत राज्य शासनाचा निर्णय रद्दबातल ठरविला होता. nखंडपीठाचा हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही २९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालात कायम ठेवला. nसेवानिवृत्तीच्या वयवाढीचा विषय लोकमतनेही सातत्याने लावून धरला होता.

बीडमधील सहा अधिकाऱ्यांनी दिला लढाबीड : राज्याच्या आरोग्य विभागातील ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी शासनाने सेवानिवृत्तीचे वय ५८वरुन ६२ वर नेले होते. याला बीडच्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आव्हान दिले होते. डॉ. संजय कदम, डॉ. संजीवनी गव्हाणे, डॉ. विकास आठवले, डॉ. ज्ञानेश्वर निपटे, डॉ. मनीषा काळे, डॉ.सतीश शिंदे, डॉ. महादेव चिंचोळे यांनी मे २०१८ मध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.