शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य भरतीतील तीन परीक्षांचे निकाल रोखले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; तक्रारींची दखल घेत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:37 IST

  मुंंबई : राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या ...

 

मुंंबई : राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या परीक्षांचे निकाल रोखण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.कारपेंटर पदासाठीची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, उर्वरित पदांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. काही गैरप्रकार झाले आहेत का, यासंबंधीचा अहवाल मागविण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले. लस म्हणजे कवचकुंडलं नाहीत कोरोनाची लस म्हणजे कवचकुंडलं नाहीत. दोन वेळा लस घेऊनही कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याची उदाहरणे आहेत, असे सांगत मास्कपासून सर्व नियम पाळा असे आवाहन टोपे यांनी केले. राज्याला येत्या तीन महिन्यांत १ कोटी ९७ लाख लोकांचे लसीकरण करायचे आहे. त्यासाठी दररोज २० लाख याप्रमाणे लसी पुरवाव्यात, अशी मागणी आज पंतप्रधानांकडे केली आहे.  सध्या कोरोनामुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांची संख्या ५ टक्के आहे; तर आयसीयूमध्ये ३.५ टक्के रुग्ण आहेत. मृत्युदर पूर्वी २.५ टक्के होता, तो आता ०.४ टक्क्यांवर आला आहे. १०० बेड असतील तरच कोविड रुग्णालयासाठी परवानगी देणार ही अट काढून टाका.. ५० बेड असेल तरी परवानगी द्या, अशी मागणी आज पंतप्रधानांकडे राज्याने केली असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकललीबुलडाणा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च राेजी राज्यभरात विविध केंद्रावर हाेणार हाेती. मात्र, महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा २१ मार्च राेजी घेण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा ६ एप्रिल राेजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती याेजना परीक्षा (एनएमएमएस) २१ मार्च रोजी राज्यभरात ३७ जिल्ह्यांतील ७६१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार हाेती. ही परीक्षा इयत्ता आठवीसाठी घेण्यात येते. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेdoctorडॉक्टरStudentविद्यार्थीexamपरीक्षा