शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

महाराष्ट्रात अनेक अँटिजन चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे; रुग्णसंख्येबाबत शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:42 IST

अचूक निदानासाठी डॉक्टरांचा आरटी-पीसीआर टेस्टवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/मुंबई : कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या अँटिजन चाचण्यांच्या चुकीच्या निष्कर्षांमुळे सर्व राज्ये धास्तावली आहेत. अँटिजन चाचणीत संसर्गाची लागण न झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण मुंबई व महाराष्ट्रात वाढले आहे. त्याच रुग्णांच्या आरटी-पीसीआर चाचणीत मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान येत आहे. त्यामुळे अँटिजन चाचण्यांच्या चुकीच्या अहवालांवर अवलंबून न राहाता आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालावरच विसंबून राहावे, असे महाराष्ट्र, तामिळनाडू आदी कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यांना वाटू लागले आहे.

मुंबईतील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांतील चाचण्यांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, कोरोना झाला नसल्याचे निदान अँटिजन चाचणीत आलेल्या ६५ टक्के लोकांची आरटी-पीसीआर चाचणी केली असता, त्यातील बहुसंख्य जणांना संसर्गाची बाधा झाली असल्याचे आढळले आहे.राज्यात कोरोनाचा संसर्ग तपासण्यासाठी अँटिजन चाचणी झाली. पण या चाचण्यांचे निष्कर्षच चुकीचे ठरत असल्याने महाराष्ट्रातील रुग्णस्थितीबाबतही संशय निर्माण झाला आहे. कोरोनाच्या संसगार्पासून मुक्त असलेल्यांची संख्या दिल्लीमध्ये अँटिजन चाचण्यांनंतर वाढली. हे त्या राज्याचे मोठे यश मानले गेले. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती असणे अपेक्षित होते. पण १८ जून ते २१ जुलै या काळात झालेल्या अँटिजन चाचण्यानंतर कोरोनामुक्त ठरविलेले १५ टक्के लोक आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे अँटीजन चाचण्यांविषयीच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार १८ जून ते २१ जुलै या कालावधीत दिल्लीमध्ये ३.६ लाख लोकांची अँटिजन चाचणी केली. त्यातील फक्त ६ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ज्यांना कोरोना झाला नसल्याचे निदान होते, त्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाल्यावर ते कोरोनाग्रस्त असल्याचे सिद्ध झाले होते. असे सुमारे १५ टक्के रुग्ण होते.

अँटीजन चाचण्यांविषयी शंका उपस्थित झाल्याने त्तामिळनाडूमध्ये रोज ११३ रुग्णालयांमध्ये ५० हजार लोकांच्या थेट आरटी-पीसीआर चाचण्याच केल्या जात आहेत. या चाचणीचे पुरेसे संच या रुग्णालयांना देण्यात आल्याचे तामिळनाडूचे आरोग्य सचिव जे. राधाकृष्णन यांनी सांगितले.बंगळुरूमध्येही साशंकताबंगळुरूमध्ये २० जुलैपासून अँटिजन चाचणी करण्यास सुरूवात झाली. तेथील प्रयोगशाळांमध्ये आतापर्यंत ८५०० नमुने गोळा झाले असून त्यांचे अहवाल मिळणे अद्याप बाकी आहे. मात्र अँटिजन चाचण्यांचे अहवाल अचूक असतील, याची शक्यता नसल्याने आरटी-पीसीआर चाचणीच्या निष्कर्षांवर अवलंबून राहाणे उत्तम असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात ९,४३१ नवे कोरोनाबाधितमहाराष्टÑात आतापर्यंत २ लाख १३ हजार २३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात ६ हजार ४४ रुग्ण कोविडमुक्त झाले. मात्र अजूनही देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रविवारी ६४ टक्क्यांवर आले आहे, मात्र राज्यात हे प्रमाण ५६.७४ टक्के इतके आहे. राज्यात रविवारी ९ हजार ४३१ रुग्ण, तर २६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ६५६ वर पोहोचला आहे.देशात २४ तासांत ४८,६६१ नवे रुग्णनवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ४८,६६१ नवे रुग्ण आढळूनआले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १३,८५,५२२ झाली आहे. त्यात दिलासादायक बाब ही की, कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८,८५,५७७वर पोहोचली आहे.देशात कोरोनामुळे रविवारी ७०५ जण मरण पावले असून त्यामुळे एकूण बळींची संख्या ३२,०६३ झाली आहे.कोव्हॅक्सिनचे निष्कर्ष समाधानकारकरोहतक : येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीचे निष्कर्ष समाधानकारक आणि उत्साहवर्धक आहेत. ही माहिती संस्थेच्या प्रमुख इन्वेस्टिगेटर सविता वर्मा यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की संस्थेत सहा जणांना ही लस देण्यात आली. देशातील 12 वैद्यकीय संस्थांमध्ये या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस