शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
6
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
7
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
8
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
9
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
10
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
11
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
12
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
13
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
14
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
15
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
16
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
17
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
18
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
19
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
20
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?

नीट परीक्षेचा निकाल जाहीर

By admin | Published: June 23, 2017 10:34 AM

मेडीकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 23 - वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे आदेश 12 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 

खरंतर मद्रास उच्च न्यायालयाने हे निकाल जाहीर करायला स्थगिती दिली होती. MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्याक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच नीट परीक्षा मागच्यावर्षीपासून सुरु झाली आहे. सीबीएसईने मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 
 
महाराष्ट्रातून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. देशभरातील जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. महाराष्ट्र सरकारने केवळ एमबीबीएस नव्हे, तर सर्वच वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’चा गुणवत्ताक्रम लागू केला आहे. दरम्यान, सदरील परीक्षेचा निकाल ८ जून रोजी अपेक्षित असताना मद्रास उच्च न्यायालयाने निकालालाच स्थगिती दिली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. 
 
 
 
 
 
नीट परीक्षा इंग्रजीबरोबरच विविध दहा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात आली. त्यात प्रादेशिक भाषांतील परीक्षेची काठिण्यपातळी इंग्रजीच्या तुलनेने कमी असल्याचा दावा करीत एका विद्यार्थ्याने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याअनुषंगाने न्यायालयाने सीबीएसई, एमसीआय तसेच शासनाला नोटीस बजावली. ७ जूनपर्यंत ‘नीट’चा निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती.‘नीट’ची काठिण्यपातळी सर्वच भाषांमध्ये सारखी असायला हवी होती.
 
प्रत्यक्षात इंग्रजीमधून परीक्षा देणाऱ्यांना अधिक कठीण राहिली, हा दावा खोडून टाकावा लागेल. अथवा देशपातळीवर गुणवत्ता यादी जाहीर करताना गुणांचे समानीकरण करण्याची एखादी पद्धत न्यायालयासमोर ठेवावी लागणार आहे. ज्यामुळे परीक्षेच्या काठिण्यपातळीत बदल असले तरी गुणवत्ताक्रम ठरविताना कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीचे सूत्र मांडावे लागणार आहे. त्यामध्ये पर्सेन्टेजऐवजी पर्सेंन्टाईल ही एक पद्धत सांगितली जाते.
 
कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. ज्यांनी अभ्यास करून परीक्षा दिली आहे, त्यांच्यावरील दडपण वाढविणारे आहे. सातत्याने दोन वर्षांचा ताण, अभ्यासाचे कठीण वर्ष पूर्ण करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेचे अभ्यासक, तज्ज्ञ पुन्हा परीक्षा घेणे अव्यवहार्य असल्याचे सांगत आहेत.
 
काठिण्यपातळी वा कुठल्याही एखाद्या मुद्द्यावर आक्षेप घेतले गेले असले, तरी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून गुणांच्या समानीकरणाचे तत्त्व न्यायालयासमोर ठेवण्याची भूमिका सीबीएसईने घेतली पाहिजे. तूर्त विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, त्यांचा ताण वाढणार नाही, असा निर्णय घेतला जाईल, शक्य असेल तर सर्वोच्च न्यायालयातही जाऊ, ही भूमिकाही का सांगितली जात नाही, हे मोठे कोडे आहे.
 
प्रारंभापासूनच ‘नीट’ परीक्षेच्या संदर्भाने विद्यार्थ्यांवर सातत्याने ताण येईल अशी धोरणे राबविली गेली. पूर्वी बारावीच्या भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र या तीन विषयांतील एकत्रित गुणांवर वैद्यकीय प्रवेश होत. १९९९ पासून राज्यात सीईटी आली. २०१०ला ‘नीट’ची घोषणा झाली. २०१२ मध्ये ती अचानक राबविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावे लागले.