शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध अखेर उठवले

By admin | Updated: October 28, 2016 21:23 IST

अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 28 - अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले निर्णय उठताच बँकेच्या राज्यात सात शाखा नव्याने स्थापन करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.तत्कालीन संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे १९९५ साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर रिझर्व्हं बँकेने निर्बंध लावले होते. नाबार्डने केलेल्या तपासणीत बँकेच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे रिझर्व्हं बँकेने राज्य बँकेवर विविध प्रकारचे ११ निर्बंध लावले होते. त्यात निगेटिव्ह नेटवर्थ असलेल्या संस्थांना कर्ज पुरवठा न करणे, बँकेच्या अध्यक्षांचे कर्ज उचल मंजुरीचे विशेष अधिकार रद्द करणे, कर्ज समिती सदस्य संख्या १५ पर्यंत सीमित करणे, अपुरा दुरावा करून उचली न देणे, अंतरिम कर्जे न देणे, निगेटिव्ह नेटवर्थ असलेल्या संस्थांना शासकीय थकहमी शिवाय कर्ज पुरवठा न करणे आदींचा समावेश होता़ हे निर्बंध उठविण्यासाठी गेल्या वीस वर्षात राज्य सरकारी बँकेने सातत्याने पाठपुरावा केला होता़ मात्र रिझर्व्हं बँकेच्या अटींची पुर्तता केल्यानंतर राज्य बँकेवरील लावलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय गुरूवारी घेण्यात आला़ राज्य बँक संचालक मंडळाच्या अनियमित कारभारामुळे तोट्यात होती़ त्यामुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती़ या काळात कारभारात सुसुत्रता आणून बँक तोटयातून नफ्यात आली़ रिझर्व्हं बँकेचे नियम व अटींची पुर्तता झाली़ बुडीत कर्जाचे प्रमाण ३१ टक्केवरून ९ टक्केवर आले़ ठेवीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली़ या कालावधीत ठेवीदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात राज्य बँक यशस्वी ठरली़ या पार्श्वभूमीवर रिझर्व्हं बँकेच्या निर्देशाचे पालन झाल्याने निर्र्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला़ -------------------सात नवीन शाखामहाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या राज्यात सात नवीन शाखा स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे़ अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना या नव्या शाखा पर्याय ठरू शकतात़ राज्यात पुणे, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, धुळे आणि बीड याठिकाणी शाखा सुरू करण्यास रिझर्व्हं बँकेने राज्य बँकेला परवानगी दिल्याची माहितीही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़--------------------कर्ज वाटप शक्यजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज दिले जाते़ अलीकडच्या काळात या बँकांनी साखर कारखानदारीला कर्जपुरवठा मोठया प्रमाणात केला आहे़ विशेषत: संचालक मंडळात असलेल्या मंडळींच्या खासगी साखर कारखान्यांना केलेल्या कर्जाची परतफेड होवू शकली नाही़ त्यामुळे रकमा कारखानदारीत अडकल्या आणि शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्जपुरवठा करण्यात अडथळे निर्माण झाले़ त्यामुळे राज्य बँक यापुढील काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेला पर्याय ठरू शकते़ विशेषत: अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांच्या ठिकाणाची निवड नव्याने शाखा काढताना करण्यात आली आहे़ ---------------------सहकारमंत्र्यांची सकारात्मकतासहकारमंत्री सुभाष देशमुख सहकार खात्यात दुरूस्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत़ विशेषत: जिल्हा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़ तरीही सरकार सहकार खाते मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका विरोधकांकडून सातत्याने होत आहे़ या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँकेवरील उठविलेले निर्बंध आणि या बँकेच्या राज्यात सात शाखा स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय सकारात्मक दिशेने वाटचाल करणारा आहे असे स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया सहकार क्षेत्रात उमटत आहेत़-----------------जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देवू शकत नाहीत़ त्यामुळे सोसायट्यांना राज्य बँकेकडून कर्ज देण्याची माझी कल्पना होती़ राज्य बँकेची पहिली शाखा लवकरच सोलापूरात उघडली जाईल़ जागेचा शोध सुरू आहे़ सोईची जागा मिळताच बँक सुरू केली जाईल़ कर्ज वाटपात स्पर्धा निर्माण झाली पाहिजे़ त्यातून माझ्या गरीब शेतकऱ्यांना सुलभ, कमी व्याजदराने कर्जपुरवठा होईल़ सहकार क्षेत्रात असलेली मक्तेदारी शेतकऱ्यांना अडचणीची ठरत होती़ आता शेतकऱ्यांसाठी नक्कीच अच्छे दिन येतील़-सुभाष देशमुखसहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य