उर्वरित परवाने प्रथम येणाऱ्या महिलांनाच!

By admin | Published: February 8, 2016 03:55 AM2016-02-08T03:55:34+5:302016-02-08T03:55:34+5:30

आॅटोरिक्षा परवान्यांना महिलांकडून अल्प प्रतिसाद लाभल्याने, उर्वरित परवान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परवान्यांसाठी प्रथम येणाऱ्या महिलांना प्राधान्य द्यायचे का

Rest of the rest of the women coming first! | उर्वरित परवाने प्रथम येणाऱ्या महिलांनाच!

उर्वरित परवाने प्रथम येणाऱ्या महिलांनाच!

Next

पंकज रोडेकर,  ठाणे
आॅटोरिक्षा परवान्यांना महिलांकडून अल्प प्रतिसाद लाभल्याने, उर्वरित परवान्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परवान्यांसाठी प्रथम येणाऱ्या महिलांना प्राधान्य द्यायचे का, अशी विचारणा ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने परिवहन आयुक्तांकडे केली आहे. याचबरोबर त्यांचा कार्यालयनिहाय कोटा निश्चित करावा, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य प्रादेशिक परिवहन विभागामार्फत यंदा एक लाख नवीन परवानेवाटप कार्यक्रमात महिलांना ५ टक्के आरक्षण दिले होते. त्या पैकी मुंबई महानगर क्षेत्रासाठी ३५ हजार ६२८ परवाने राखीव आहेत. त्याचप्रमाणे, १ हजार ७८१ महिला परवान्यांचा समावेश आहे. त्या परवान्यांचा आॅनलॉइन लॉटरी ड्रॉ १२ जानेवारी रोजी काढण्यात आला. या लॉटरीमध्ये एकूण ४६५ महिलांनी अर्ज केल्यामुळे, त्या सर्व महिलांना विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित १ हजार ३१६ रिक्षा परवान्यांचा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.
ज्या उद्देशाने महिलांना या परवान्यांमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आले आहे, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आणि महिलांकडून याला प्रतिसाद लाभण्यासाठी, प्रथम येणाऱ्या महिलांना हे परवाने प्राधान्याने द्यावे का? अशी विचारणा केली आहे. सर्व कार्यालयांनी प्राधान्याने महिलांना रिक्षा परवाने देऊन, रोजच्या रोज परिवहन आयुक्त कार्यालयास महिती द्यावी लागेल. जेणेकरून परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये माहिती संकलित होईल आणि १३१६ हा आकडा पूर्ण झाल्यावर महिलांना रिक्षा परवाने देण्याचे बंद करणे शक्य होईल. या सूचनाबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Rest of the rest of the women coming first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.