शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या मोबदल्यामुळे भूसंपादनाला प्रतिसाद; मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 10:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी प्रस्तावित पुणे-बंगळुरू नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, याला उत्तर देताना ते बोलत होते.

मुंबई : रस्ते प्रकल्पांसाठी होणाऱ्या भूसंपादनाचा चांगला मोबदला मिळत असल्यामुळे लोकांचा विरोध मावळत असून, लोक पुढाकार घेत आहेत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी प्रस्तावित पुणे-बंगळुरू नवीन महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, याला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्र सरकारच्या सहकार्याने विकसित करण्यात येणारे राज्यातील रस्ते प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. महामार्गासाठी सुपीक जमिनी जाऊ नयेत, मात्र या महामार्गामुळे आसपासच्या परिसराची आर्थिक उन्नती होईल, असे त्यांनी सांगितले.अंबाजोगाई-गीता-जळगाव रस्त्याचा निर्णय लोकहितास्तवअंबाजोगाई-गीता-जळगाव हा बीड आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता असून, या रस्त्याच्या बांधकामासाठी गळीत धान्य संशोधन उपकेंद्र अंबाजोगाई येथील जमिनीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर हा रस्ता हस्तांतरित करण्याबाबत कृषी विद्यापीठाने ठराव करून मान्यता दिली आहे. मात्र, गळीत धान्य संशोधन उपकेंद्र यांची जमीन कृषक अथवा अकृषक प्रयोजनासाठी न देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे लोकहितास्तव हा प्रश्न सोडविण्यासाठी कृषी विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भातील संजय दौंड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण