शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचा आदर, पण...; जितेंद्र आव्हांडांचा स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 05:30 IST

राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच, शरद पवारांची मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनाच पसंती

नवी मुंबई : राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनाच पसंती आहे आणि पवार यांनी पुणे येथील खासगी चर्चेत हे मत व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. 

महापालिकांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे. पण, ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे पोटात एक व ओठात एक सुरू आहे. शिवसेना त्यांच्या सोयीप्रमाणे वाॅर्डरचना करीत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. नवी मुंबईत ऐरोली येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यात आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. राज्यात १९९० नंतर कोणत्याही एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर आलेले नाही. यापुढेही येण्याची शक्यता नाही. त्यामुळे आघाडी अपरिहार्य आहे. मात्र ती करताना सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्यावर त्यांनी भर दिला. राज्यात आघाडी केली जात असताना ठाणे जिल्ह्यात दादागिरी करून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आघाडी करण्याची भाषा बोलली जाते, परंतु प्रत्यक्षात स्वबळाची तयारी केली जात आहे. नवी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक काँग्रेस अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी नेते दबाव टाकत असल्याची टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली. आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, जी. एस. पाटील, प्रशांत पाटील, अशोक गावडे आदी उपस्थित होते.

मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचा आदर; पण...भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे. शिवसेना मोठा भाऊ म्हणून त्यांचा जिल्ह्यात आदर करू; पण बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना