शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सर्वपक्षीय नेत्यांची आबांना आदरांजली

By admin | Updated: February 21, 2015 02:58 IST

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील म्हणजे स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असणारे राजकारणी व मनमिळाऊ सहकारी होते.

मुंबईत शोकसभा : आठवणींनी भावनेचा बांध फुटला, आबांनी केलल्या संघर्षाला, कष्टाला अन् सचोटीला सलाम मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील म्हणजे स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असणारे राजकारणी व मनमिळाऊ सहकारी होते. आबांसारख्या लोकप्रिय नेत्याच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाली असून, नजीकच्या काळात ती भरून निघणे अशक्य आहे, अशा शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी आबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आरपीआयसह सर्वच पक्षांचे नेते शोकसभेला उपस्थित होते. मोठ्या कष्टातून राज्यातील ग्रामीण भागात एखादे व्यक्तिमत्त्व घडावे, त्याला लोकांची मान्यता मिळावी आणि त्याचवेळी ती व्यक्ती अवेळी आपल्यातून निघून जावी, असे हे भेसूर चित्र आहे. अवघ्या ५७-५८ वर्षांच्या आबांना अशाप्रकारे श्रद्धांजली वाहण्याच्या प्रसंग येईल असे वाटले नव्हते, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सातवीत जिल्ह्यात प्रथम, दहावीत विभागात प्रथम आणि बीए परीक्षेत सांगलीत सर्वप्रथम येत त्यांनी शिक्षण पूर्ण केल्याची आठवण पवार यांनी सांगितली. शांतीनिकेतन महाविद्यालयात माझे भाषण आयोजित करण्यात आले होते. मात्र कोणत्याही मंत्र्याला कॉलेजमध्ये बोलवायचे नाही, ही आमची भूमिका असल्याचे सांगत आबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाला विरोध केला होता, असे पवार यांनी नमूद केले.कमवा आणि शिका योजनेतून मिळणारी रक्कम दुप्पट करण्याच्या अटीवरच आबांनी कार्यक्रमाला मंजुरी दिली होती, असे पवार यांनी सांगताच आबांच्या मुत्सद्दीपणावर उपस्थित भावूक झाले. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, महसूल मंत्री एकनाथ खडसे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे आदींनी आबांना श्रद्धांजली वाहिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि ‘लोकमत’चे एडिटर-इन- चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आबांच्या कष्टला, संघर्षाला अन् सचोटीला सलाम केला. (प्रतिनिधी) भाजपाच्या मंत्र्यांनी शब्द पाळला!च्तंबाखू सोडा, प्लीज... मला वचन द्या..., असे म्हणत आबांनी भाजपाचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा हात हातात घेतला होता. त्या आठवणीने व्यथित होत मेहतांनी जाहीर शोकसभेत आबांच्या फोटोसमोर खिशातल्या तंबाखूच्या पुड्या ठेवल्या आणि आजपासून आपण तंबाखू सोडली, असे जाहीर केले.च्ते म्हणाले, विधानसभेत मी आणि आबा एकाचवेळी आलो. त्या वेळी मी, सुधीर मुनगंटीवार, नवाब मलिक, बाळा नांदगावकर, आबा अशा पाच-सहा जणांचा ग्रुप होता. आम्ही दरवेळी तंबाखू खाताना आता सोडायची, असे एकमेकांना बजावत असू. मात्र काहींची सुटली.. काहींची नाही. आबांचा आजार वाढला तसे मी त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो. मला पाहून आबा म्हणाले, ‘‘प्रकाशभाई एक वचन द्या, तंबाखू सोडा.’’ त्यांनी माझा हात हातात घेतला, म्हणाले, ‘‘प्लीज.. प्लीज, सोडा ती तंबाखू.’’ मला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून भरून आले.च्४० वर्षांची सवय अशी सुटणार नाही, पण आज मी तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने तंबाखू सोडतो. माझ्या खिशातल्या पुड्या आबांच्या फोटोपुढे ठेवतो, असे म्हणत मेहता खिशातल्या पुड्या घेऊन फोटोपुढे गेले. तेथे त्यांनी पुड्या ठेवल्या !